प्रथमच राज्य पातळीवर निवड
- rat२७p६.jpg-
P२५O०६९४९
रत्नागिरी ः हातकणंगले येथे झालेल्या विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धेत जीजीपीएसच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना मान्यवर.
जीजीपीएसच्या क्रिकेट संघाची
प्रथमच राज्यपातळीवर निवड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : हातकणंगले (नवे पारगाव) येथे झालेल्या विभागीय शालेय क्रिकेट (१४ वर्षाखालील मुले) स्पर्धेमध्ये श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्रजी माध्यमाच्या शाळेने यश मिळवले. आता हा संघ राज्यस्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
प्रशालेचे क्रीडाशिक्षक प्रमोद कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या संघाने अजिंक्यपद मिळवले. ही स्पर्धा उद्या (ता. २८) नोव्हेंबरला नाशिक येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली. प्रशालेचे क्रीडाशिक्षक प्रमोद कदम व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अपूर्वा मुरकर, कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे यांनी अभिनंदन केले व पुढील राज्यस्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

