महाआजार कॅन्सर वाढतोय, सावध व्हा
लोगो-----------आरोग्यभान ः वैयक्तीक - सार्वजनिक
(२२ नोव्हेंबर टुडे ३)
महाआजार कॅन्सर
वाढतोय, सावध व्हा
एकविसाव्या शतकात जीवनशैलीचे आजार जसे मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, थायरॉईड सोबत कॅन्सरचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. कॅन्सर क्षेत्रातील अग्रगण्य संस्था ग्लोबोकॅन (GLOBOCAN) च्या अंदाजानुसार, जागतिक पातळीवर २०२२ मध्ये सुमारे २ कोटी नवीन कर्करोग रुग्ण आणि सुमारे ९.७ लाख मृत्यू झाले. भारतात दरवर्षी अंदाजे १४–१५ लाख नवीन कर्करोग रुग्ण आढळतात आणि हा आकडा दुप्पट, तिप्पट वाढण्याची शक्यता आहे. कॅन्सर शरीरातील कुठल्याही अवयवाला होऊ शकला तरी काही कॅन्सर जास्त प्रमाणात दिसून येतात. सर्वाधिक आढळणारे कर्करोग : स्तन (स्त्री) फुप्फुस, मोठे आतडे (कोलोरेक्टल), प्रोस्टेट, पोटाचा (गॅस्ट्रिक), यकृत (लिव्हर) याचे आहेत.
- rat२७p७.jpg-
25O06951, P25O06950
- डॉ. सुनील व डॉ. श्रुतिका कोतकुंडे
---
भारतामधील प्रमुख कर्करोग: तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा (सर्व्हिकल), फुप्फुसाचा, मोठ्या आतड्याचा
शहरी भागात स्तनाचा कॅन्सर जास्त तर ग्रामीण भागात तंबाखू-संबंधित (तोंड, घसा, अन्ननलिका) कॅन्सर अधिक आढळतात.
शहरीविरूद्ध ग्रामीण कर्करोग पॅटर्न शहरी भागात स्तन कर्करोग वाढण्याची कारणे ः व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली ज्यामुळे वाढणारा लठ्ठपणा. मुली शिक्षण नोकरीमुळे विवाह किंवा प्रसूती लांबवणे, शहरांत जागरूकतेमुळे तपासणी निदान व उपचार लवकर होताना दिसतात.
ग्रामीण भागात कर्करोग वाढण्याची कारणे ः तंबाखूचे प्रमाण (विशेषत: गुटखा, पान खैनी) जास्त, स्तन व गर्भाशय तपासणी पुरेशा वैद्यकीय सेवेअभावी वेळेवर होत नाही. वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे निदानाला उशीर होतो. शहराच्या तुलनेत तोंडाचा, गर्भाशय मुखाचा कर्करोग जास्त प्रमाणात आढळतो.
कर्करोगाची कारणे- तंबाखू, धूम्रपान व गुटखा, मद्यपान. वारंवार होणारा जंतूसंसर्ग HPV (सर्व्हिकल), HBV/HCV (लिव्हर), H. pylori (पोट), लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव. रस्त्यावरचे निकृष्ट अन्न, जंकफूड अवेळी खाणे, वाढते अन्न, हवा, पाणी प्रदूषण, घातक प्लास्टिकचा अन्नसाखळीमध्ये शिरकाव, सूर्यकिरणांमुळे त्वचेचा कर्करोग, वाढलेले आयुर्मान, अनुवांशिकता. कर्करोगानुसार लक्षणे बदलतात; परंतु खालील बाबींकडे दुर्लक्ष करू नये. वजन सातत्याने कमी होणे, भूक कमी होणे, सतत थकवा, शरीरातील भागात अचानक गाठ किंवा सूज जाणवणे, दीर्घकालीन खोकला, रक्ताळ खोकला, मलमुत्रात रक्त, मलावरोध किंवा सवयी सातत्याने बदलणे, तोंडातील न भरून येणाऱ्या जखमा असणे, गिळताना त्रास, आवाज बसणे, योनीतून, गुद्द्वारातून अतिरिक्त, असामान्य रक्तस्राव कोणतेही लक्षण काही आठवडे कायम राहिल्यास त्वरित तपासणी करावी. लवकर निदान झाल्यास उपचार परिणामकारक असतात, हे जाणावे. तरीही हे टाळण्यासाठी प्रयत्न करणे जास्त महत्वाचे
कर्करोग होऊ नये यासाठी तंबाखू, गुटखा घेणे टाळावे, मद्यपान टाळावे, नियमित व्यायाम, वजन संतुलित ठेवावे. आहारात फास्टफूड, पाकिटबंद पदार्थ टाळावे. तेलाचा वापर कमी करावा. पदार्थ वाफवून भाजून, उकडून खावेत. पुन्हा पुन्हा तळलेल्या तेलाचा वापर टाळावा. तेलाचा जाळ करू नये. फळभाज्यांचा मुबलक वापर करावा.
लसीकरण उपलब्ध असल्यास स्वीकारावे. उदा. HPV गर्भाशय मुख, HBV लिव्हर ः लवकर निदान व उपचार, स्तन ः वैद्यकीय तपासणी, मॅमोग्राफी, बायोप्सी. गर्भाशय मुख ः वैद्यकीय तपासणी किंवा पॅपस्मिअर. तोंड ः कुठल्याही जखमेचे लवकर निदान व उपचार , मोठे आतडे ः रक्तस्राव होत असल्यास स्कोपीने लवकर निदान होऊ शकते.
सार्वजनिक आरोग्य विभाग ः राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत शीघ्र निदान व उपचारास प्राधान्य दिले आहे. सर्व जिल्हा व उपजिल्हा ठिकाणी या सेवा उपलब्ध असतात. आयुष्मान भारतअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आर्थिक मदत, उपचाराचा खर्च दिला जातो. आयसीएमआर या शासकीय संस्थेअंतर्गत कॅन्सर नोंद ठेवली जाते. अचूक आकडे गोळा केल्याने धोरणे आखणीस मदत होते. राज्यस्तरीय योजना अनेक राज्यांमध्ये स्वतंत्र कर्करोग सोसायटी, मोफत किंवा सवलतीची तपासणी, उपचार सहाय्य योजना असतात.
ग्रामीण भागात निदान होण्यास खूप उशीर होतो. यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता वाढते. दीर्घ उपचाराचा व पुन्हा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णाला व कुटुंबावर आर्थिक भार, अपुऱ्या सेवेअभावी व अपूर्ण नोंदणीमुळे समस्येची गंभीरता अस्पष्ट राहते. तंबाखू, मद्यपानाचा व निकृष्ट खाद्यसंस्कृतीचा वाढता प्रसार. कॅन्सर टाळण्यासाठी तंबाखू, मद्यपान टाळा. व्यायाम करा, वजन नियंत्रित ठेवा. भरपूर भाज्या, फळे आहारात घ्या. पाकिटबंद अन्न टाळा. पुन्हा पुन्हा तळलेल्या तेलाचा वापर टाळा. प्लास्टिकचा वापर टाळा. लस उपलब्ध असल्यास लस घ्या. नियमित वैद्यकीय तपासणी विशेषतः चाळिशीनंतर स्तन, तोंड, गर्भाशय यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. कुठलीही जखम, गाठ असल्यास दुर्लक्ष करू नका.
(लेखक आरोग्यक्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

