भारतीय संविधानामुळे लोकशाही भक्कम
swt278.jpg
06984
कट्टा : सेवांगणतर्फे आयोजित संविधान दिन उपक्रमास किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, दीपक भोगटे, अर्चना धुत्रे व इतर मान्यवर उपस्थित होते.
भारतीय संविधानामुळे लोकशाही भक्कम
किशोर शिरोडकरः कट्टा येथे सेवांगणतर्फे संविधान दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २७ः भारताची घटना ही जगातील सर्वात मोठी घटना आहे. ती तयार करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास केला. अथक परिश्रम करून लोकाभिमुख अशी घटना तयार केली. भारताची लोकशाही अधिक सामर्थ्यवान होण्यासाठी या घटनेचा समर्थपणे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. अशा या संविधानाच्या ७५ व्या वर्षात अनेक उपक्रम सेवांगणच्या वतीने राबविण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन बॅ. नाथ पै सेवांगण मालवणचे कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर यांनी कट्टा येथे संविधान दिन कार्यक्रमात केले.
बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात वराडकर हायस्कूल कट्टाचे विद्यार्थी तसेच महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी बापू तळावडेकर, दीपक भोगटे, अर्चना धुत्रे, विद्या चिंदरकर, मंगल पराडकर, मनोज काळसेकर, साक्षी अमरे, श्रीधर गोंधळी उपस्थित होते. यावेळी शिरोडकर यांनी संविधान निर्मितीची प्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगितले. वराडकर हायस्कूलचे विद्यार्थी ओंकार रोहिलकर व इशा ताम्हणकर यांनी संविधानाविषयी आपले विचार मांडले. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थ्यांना संविधान विषयक पुस्तके भेट देण्यात आली.
श्री. भोगटे म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा थोडक्यात आढावा घेतला. १९४२ चे मजूरमंत्री पद व १९४७ चे कायदामंत्री पद या काळात डॉ आंबेडकर यांनी अनेक लोकोपयोगी उपक्रम हाती घेतले. भाक्रानांगलसारखी अनेक धरणे त्यांच्या कालखंडात बांधण्यात आली. महिलांना जाचक असणाऱ्या अनेक रुढी बंद करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी अनेक कायदे त्यांनी केले. संविधानात स्त्रियांना मतदानाचा अधिकार कोणताही संघर्ष न करता मिळाला. शाळेच्या वर्गाबाहेर बसणारे डॉ. आंबेडकर कोलंबिया विद्यापीठाचे सर्वश्रेष्ठ स्कॉलर विद्यार्थी ठरले. हे सर्व भारतीयांच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचे काम अजोडच आहे. दलित समाजाला उन्नत करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. समाजाच्या सर्व घटकांनी त्यांचे ऋण मानणे आवश्यक आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

