परप्रांतीय व्यावसायिकांमुळे स्थानिक अडचणीत

परप्रांतीय व्यावसायिकांमुळे स्थानिक अडचणीत

Published on

swt2721.jpg
07042
मालवणःयेथे तालुक्यातील डंपर, जेसीबी व ट्रॅक्टर व्यावसायिक परप्रांतियाविरोधात एकवटले. (छायाचित्र- गणेश गावकर)

परप्रांतीय व्यावसायिकांमुळे स्थानिक अडचणीत
संघटनेचा आरोपः अंकुश ठेवा; अन्यथा संघर्ष अटळ
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २७ : तालुक्यातील जेसीबी, डंपर, ट्रॅक्टर या व्यवसायामध्ये परप्रांतीयांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यांना आतापासूनच दूर करून स्थानिकांना सहकार्य करावे. परप्रांतीय बनावट कागदपत्रासह मालवणात वास्तव्यास असून प्रशासनानेही त्यांच्यावर अंकुश ठेवावा; अन्यथा पुढे संघर्ष अटळ आहे, असा इशारा येथील स्थानिक डंपर, जेसीबी व ट्रॅक्टर व्यावसायिकांनी पत्रकार परिषदेत दिला.
मालवण देऊळवाडा येथील हॉटेल विसावा येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी डंपर, जेसीबी व्यावसायिकांच्या संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार नामनाईक, शुभम म्हाडदळकर, युवराज गावकर, सुरेश नाईक, महेश पेडणेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मालवणात मजूर कामगार म्हणून आलेले परप्रांतीय व्यक्ती आता स्वतः व्यावसायिक बनत आहे. या परप्रांतीय लोकांनी काही स्थानिकांना हाताशी धरून त्यांच्या नावे ट्रक्टर, जेसीबी, डंपर विकत घेऊन व्यवसायात उतरले; मात्र जेसीबी, ट्रॅक्टर व डंपर वाहतूक व्यवसायातील दराच्या किंमतीच्या २० टक्के किंमत उतरवून ते व्यवसाय करीत आहेत. स्थानिक लोक देखील कमी किंमतीत काम करता येत असल्याने या परप्रांतीय लोकांनाच कामे देत आहेत. यामुळे स्थानिक व्यवसायिकांना कामे मिळेनाशी झाली असून व्यवसायात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहे.
याप्रश्नी आम्ही दीड-दोन वर्षांपूर्वी लढा उभारला होता. आमची संघटना करून त्यात दर निश्चितीचे नियम करण्यात आले; मात्र ते नियम डावलून परप्रांतीय व्यक्ती व्यवसाय करत आहेत. असेच सुरू राहिल्यास आम्ही स्थानिक व्यावसायिक भविष्यात नष्ट होऊन परप्रांतीय व्यक्तींची कोणाशीही स्पर्धा नसेल. त्यावेळी ते अधिक किंमतीमध्ये कामे करायला सुरुवात करतील. मग स्थानिकांना त्या किंमतीमध्ये कामे करून घ्यावी लागतील. त्यामुळे आज स्थानिक व्यक्तींचा विचार करून पाऊले उचलली पाहिजेत. स्थानिक व्यावसायिकांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. बँकांचे हप्ते कसे भरायचे, हा प्रश्न व्यावसायिकांना भेडसावत आहे. यावेळी ''करो या मरो'' या उद्देशानेच या लढाईमध्ये उतरलो आहोत, असे यावेळी व्यावसायिकांनी सांगितले.

चौकट
पोलिस प्रशासनाने चौकशी करावी
मालवणात राहणारे हे परप्रांतीय बहुतांश कर्नाटक राज्यातून आलेले आहेत. त्यांच्याकडे या ठिकाणचे रेशनकार्ड व मतदान कार्ड देखील आहे. त्यांच्या राज्यातील देखील मतदान कार्ड व रेशनकार्ड आहे. चुकीच्या पद्धतीने ते एकाचवेळी दोन्ही राज्यांतील सेवा सुविधा व योजनांचा लाभ मिळवत प्रशासनाला फसवत आहेत. या परप्रांतीयांची पोलिस प्रशासनाने चौकशी करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com