फ्लॅशबॅक

फ्लॅशबॅक

Published on

फ्लॅशबॅक---------लोगो

चिपळूण शहरातील आठवणी--------लोगो

शेंगांची इमारत अन्
बैलगाडीचा प्रवास


चिपळूणच्या चतु:सिमेवरील जकातनाक्यामधून पालिकेला उत्पन्न मिळत होते. शेंगदाण्यांच्या व्यापारामधून नगरपालिकेला उत्पन्न खूप मिळत असे, म्हणून नगरपालिकेच्या इमारतीला शेंगांची इमारत म्हणत असत.

- मुझफ्फर खान, चिपळूण
----
पूर्वी चिपळूण शहराची वस्ती आणि आकारमान खूपच लहान होते. वेसमंदिर चिपळूण शहराची सीमा होती. मंदिराच्या पुढे आताचे मुख्याधिकारी निवास आहे. त्या ठिकाणी नगरपालिकेचा जकातनाका होता. त्या जकातनाक्यावर घाटावरून बैलगाडीतून येणाऱ्या मालाचे जकातीचे उत्पन्न सर्वात ज्यादा होते. दुसरा जकात नाका मंगलौरी कौले, रॉकेल डबे, मीठ आणि मुंबईहून येणाऱ्या किराणा मालाच्या व्यापारी मालावर जकात घेण्यासाठी संपूर्ण झापांनी बांधलेला नाका बाजार पुलाजवळ होता. चिपळूण-गुहागर नाका येथे परकार यांच्या फातिमा चाळीत शेवटच्या खोलीमध्ये नाका होता. पागेवरील नाक्यावर चौथा जकात नाका होता. चिपळूण शहरामध्ये माजी नगरसेवक मुनिरशेठ पालकर (खाटीक) यांचे आजोबा वल्लीभाई खाटीक यांचा कुस्तीचा आखाडा होता. खेळताना पायाच्या हाडाचा खांदा निखळला तर वल्लीभाई खाटीक एंरडेल तेल लावून हळूवार मालिश करत आणि खटकन आवाज आला की, खांद्याचे हाड खोबणीत बसत असे. त्यानंतर गुळाचा लेप त्यावर कापूस चिकटवून एक पट्टी खाली आणि एक पट्टी वरती ठेवून कापडी पटट्याने बांधून १५ दिवसाने पेशंट खणखणीत बरा व्हायचा, अशी त्यांच्या हातामध्ये परमेश्वराने कला दिली होती. या कामाचे ते कधीही पैसे घेत नव्हते.
१९६७ ला प्रचंड मोठा भूकंप झाला. तो चिपळूणच्या इतिहासामध्ये पहिला भूकंप मानला जातो. कोयनानगर आणि चिपळूण शहरामध्ये घरांना तडे गेले. कोयनानगर येथे धाब्याची घरे असल्यामुळे अनेकांची घरे पडली. मनुष्यहानी झाली आणि हाहाकार माजला होता. चिपळूण शहरात १९०५ ला पहिला महापूर आला. त्या वेळी दुकानाच्या पागोळीला पाणी लागले होते. त्यानंतर १०० वर्षांनी २००५ ला पागोळीला पाणी लागले, असा महापूर आला. १९६५ ला आणि त्यानंतर २०२१ ला नदी गाळाने भरल्याने सर्वांचेच प्रचंड नुकसान झाले, असा पूर आला होता.
चिपळूणचा शिमगा हा महाराष्ट्रामधील प्रसिद्ध शिमगा, अशी ओळख आहे. पूर्वी एका बांबूला डबा बांधून त्यामध्ये खोबऱ्याच्या वाट्या पेटवून पालखीजवळ लाईटची व्यवस्था करत असत आणि ढोलांभोवती राणी छाप मेंटल बांधलेल्या पेट्रोमॅक्स बत्तीने लाईटची व्यवस्था करत होते. साधारण १९५२ ला चिपळूण एसटी बससेवा सुरू झाली. भाजीमंडईसमोर जुने बसस्थानक आहे. ते मुख्य बसस्थानक होते. सुरवातीच्या काळात खेडेगावात जाण्यासाठी रस्ते नव्हते. त्यामुळे खेडेगावात ये-जा करण्यासाठी बैलगाडीचाच प्रवास करावा लागत असे. खेडेगावात रस्ते कुठले खडकाळ भागातून शेतीचे बांध फोडून बैलगाडी जाईल, असा लहान रस्ता बैलगाडीचे चाक उजव्या बाजूस वरती गेले की, उजव्या बाजूकडे बसलेली व्यक्ती समोरच्या डाव्या बाजूला बसलेल्या व्यक्तीच्या मांडीवर जायची किंवा डोक्यावर डोके आपटायचे, असा हा बैलगाडीचा प्रवास चिपळूण शहरवासियांनी तेव्हा अनुभवला आहे. त्यानंतर हळूहळू डांबरी रस्ते झाले, त्याचे महामार्गात रूपांतर झाले. चिपळूण शहराचे महत्त्वही वाढले. तरीही त्या आठवणी आजही अनेकांनी जपलेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com