राजापूर पासपोर्ट कार्यालयाचा कोकणवासीयांना फायदा
rat२८p११.jpg-
०७१६४
राजापूर ः येथील टपाल कार्यालयातच पासपोर्टची सुविधा उपलब्ध आहे.
------------
राजापूर पासपोर्ट कार्यालयाचा कोकणवासियांना फायदा
८ हजार ६२६ पासपोर्टचे वितरण ; मुंबईत जाण्याचा वाचले
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २८ ः शिक्षण, व्यवसाय, नोकरी, व्यापारानिमित्त परदेशात जाणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्याचबरोबर आता पर्यटनासाठीही परदेशात जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. राजापूर येथे सुरू करण्यात आलेल्या पासपोर्ट कार्यालयाचा परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या कोकणवासियांना फायदा होत आहे. गेल्या वर्षभरामध्ये ८ हजार ६२६ लोकांनी पासपोर्ट काढल्याची माहिती येथील पासपोर्ट कार्यालयातून देण्यात आली.
परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट काढावा लागतो. कोकणवासियांना पासपोर्टसाठी यापूर्वी अनेकवेळा मुंबईला फेऱ्या माराव्या लागत होत्या; मात्र, राजापूर पोस्ट कार्यालयात पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्याने गेल्या सहा वर्षापासून हा त्रास बंद झाला आहे. नोकरी, शिक्षण, व्यवसाय वा फिरण्याच्या निमित्ताने कोकणातील अनेकजण परदेशवारी करतात. अनेक मुस्लिम बांधव हज यात्रेनिमित्ताने परदेशवारी करतात. कोकणामध्ये पासपोर्ट कार्यालय नसल्याने कोकणवासियांना पासपोर्ट काढण्याठी मुंबईला जावे लागत होते. त्यामध्ये वेळेसह पैशाचाही मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या राजापूर येथील टपाल कार्यालयामध्ये ऑगस्ट २०१८ मध्ये पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात आले. त्यामुळे पासपोर्ट काढणे अधिक सुलभ झाले आहे. गेल्या वर्षभरामध्ये या कार्यालयातून शिक्षण, व्यवसाय, नोकरी, व्यापार वा पर्यटन निमित्ताने गेल्या अकरा महिन्यांमध्ये तब्बल ८ हजार ६२६ लोकांनी पासपोर्ट काढल्याची माहिती येथील पासपोर्ट कार्यालयातून देण्यात आली.
चौकट
असा करता येईल अर्ज
पासपोर्टसाठी पूर्वीसारख्या खेपा न मारता ऑनलाइन पद्धतीने पासपोर्ट www.passportindia.gov.in या संकेतस्थळावर पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज करावा लागतो. पासपोर्ट काढण्यासाठी त्या व्यक्तीचे आधारकार्ड, मतदार कार्ड किंवा छायाचित्र असलेला पुरावा आदी कागदपत्रांच्या सत्य प्रती तसेच मूळ प्रती सादर कराव्या लागतात. ऑनलाइन अर्ज करताना सत्य प्रती जोडाव्या लागतात. मुलाखतीच्या वेळी मात्र, मूळ प्रती सादर कराव्या लागतात. कागदपत्रे पूर्ण असतील तर पोलिसांच्या पडताळणीनंतर १५ दिवसांत पासपोर्ट अगदी घरपोच पाठवला जातो. कागदपत्र जमा करण्यासाठी मुलाखतीचा दिवस स्वत:च ठरवता येतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

