कान्हे ग्रामपंचायतीतर्फे गुणवंतांचा सत्कार

कान्हे ग्रामपंचायतीतर्फे गुणवंतांचा सत्कार

Published on

कान्हे ग्रामपंचायतीतर्फे
गुणवंतांचा सत्कार
चिपळूणः तालुक्यातील कान्हे ग्रामपंचायतीच्यावतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने गावातील राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणारे खेळाडू व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रीय स्तरावरील प्राची मोहिते, श्रेयस मोहिते (नॅशनल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये निवड), राज्य व जिल्हास्तरावरील अथर्व दवंडे (राज्यस्तरीय धावण्याच्या स्पर्धेत यश), संचित मोरे (जिल्हा कबड्डी संघात निवड), विशेष उल्लेखनीय विद्यार्थ्यांमध्ये सानिका जाधव (एनसीसी कॅम्पमधून अरूणाचल प्रदेश येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व), सिया मोहिते (तालुकास्तरावरील वक्तृत्व स्पर्धेत यश) या विद्यार्थ्यांना आणि खेळाडूंना गौरवण्यात आले.
----------
वेरळच्या आश्रमशाळेत
चित्रकला स्पर्धा
मंडणगड ः तालुक्यातील वेरळ येथील शासकीय आश्रमशाळेत शाहू फाउंडेशनच्यावतीने संविधान दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. संविधानविषयक चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आरोग्य विभागातर्फे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झाली. ॲड. ज्ञानरत्न जाधव यांनी संविधानाच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले. कृषी अधिकारी सचिन पवार यांनी व्यक्तिमत्व विकास व करिअर मार्गदर्शन विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नगरसेवक आदेश मर्चंडे, तालुका कृषी अधिकारी सोमनाथ आहेरकर, प्राचार्य मदन खामकर, अध्यक्ष राकेश मर्चंडे आदी उपस्थित होते. तीन गटांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
----------------
निकम महाविद्यालयात
‘संविधान दिन’
सावर्डे : मांडकी-पालवण येथील गोविंदराव निकम कृषी महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. देशाचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारले गेले. या दिनाचे महत्त्व तरुणपिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी व संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी उपस्थितांनी भारताच्या संविधानाचे पालन करण्याची, देशाची सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्याची तसेच समानता, न्याय आणि बंधूता या मूल्यांची जपणूक करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. या वेळी प्राचार्य डॉ. संकेत कदम, प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य बाळासाहेब सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
------------
ग्रामपंचायत इमारत
बांधकामाचे भूमिपूजन
चिपळूण ः तालुक्यातील मालघर येथे सरपंच सुनील वाजे यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. या इमारतीमध्ये सर्व शासकीय सेवा एकाच छताखाली सुरू होणार आहेत. कार्यक्रमाला ग्रामसेविका सुजल भारती, महसूल अधिकारी बंडगर, पोलिस पाटील अजय वाजे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रभाकर तटकरे, उपसरपंच अरूण खेडेकर, ग्रामपंचायत सदस्य गंगाराम महाडिक आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com