फ्लॅश बॅक
-rat२८p२२.jpg-
२५O०७२०५
राजापूर ः छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह.
-----
फ्लॅश बॅक------------लोगो
राजापुरात होते दोन रंगमंच
सह्याद्रीच्या पायथ्यापासून थेट अरबी समुद्रापर्यंत विस्तारलेल्या राजापूर तालुक्याला सांस्कृतिक चळवळीचा वेगळा वारसा लाभलेला आहे. ऐतिहासिक नगरी असलेल्या राजापूर शहरामध्ये श्री देव धूतपापेश्वर आणि (कै.) द. ज. सरदेशपांडे असे दोन खुले रंगमंच होते. या ठिकाणी होणाऱ्या व्यावसायिक नाटकांचा आनंद लुटताना आवडत्या दिग्गज कलाकाराला जवळून बघण्याची अन् अनुभवण्याची संधी साधण्यासाठी शहरातूनच नव्हे तर, ग्रामीण भागातूनही त्या काळात बैलगाडीने वा मिळेल त्या वाहनाने नाहीच जमले तर शहर परिसरातील रसिक पायी चालत येऊन नाटक पाहत असत. राजापूरच्या सांस्कृतिक चळवळीचे साक्षीदार असलेले खुले रंगमंच कालपरत्वे बदलावामध्ये इतिहासजमा झाले असले तरी, या खुले रंगमंच ते राजापूर नगरपालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह असा झालेला राजापूरच्या सांस्कृतिक चळवळीचा प्रवास लक्षवेधी म्हणावा लागेल.
- राजेंद्र बाईत, राजापूर
---
डोंगरदऱ्यातून विस्तारलेल्या राजापूरने चित्रपटांसह नाट्यसृष्टीसाठी नामवंत कलाकार, निर्माते, दिग्दर्शक दिले आहेत. प्रसिद्ध नाट्यअभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे राजापूर हे जन्मगाव. शहरातील राजापूर हायस्कूलसमोर असलेल्या जुन्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या येथे त्यांचा जन्म झाल्याची माहिती जुनेजाणते सांगतात. अशा या राजापूर तालुक्याचे राजापूर शहर हे मध्यवर्ती ठिकाण. दैनंदिन धावपळीच्या जीवनापासून थोडा विरंगुळा मिळावा आणि त्या माध्यमातून आनंदमय जीवन व्हावे यासाठी नाट्यगृहासारख्या करमणुकीच्या साधनांची आवश्यकता असते; मात्र ४०-४५ वर्षापूर्वी नाट्यगृहासारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. तरीही त्या काळामध्ये राजापूर शहरामध्ये श्री देव धूतपापेश्वर आणि (कै.) द. ज. सरदेशपांडे असे दोन खुले रंगमंच होते. या खुल्या रंगमंचावर अनेक नामवंत अन् दर्जेदार नाटके झाली. त्यामध्ये नटसम्राट, इथं ओशाळला मृत्यू, तो मी नव्हेच, कालचक्र, वाहतो ही दूर्वांची जुडी, कुसुम मनोहर लेले, घाशीराम कोतवाल, सही रे सही, कुसुम मनोहर लेले यांसह अनेक नाटकांचे प्रयोग झाले. या नाटकांच्या माध्यमातून डॉ. काशिनाथ घाणेकर, राजापूरची सुकन्या सविता मालपेकर, बाळ कोल्हटकर, दिलीप कोल्हटकर, डॉ. श्रीराम लागू, यशवंत देव, प्रभाकर पणशीकर, रमेश भाटकर, सुधीर जोशी, मोहन जोशी, प्रशांत दामले, लक्ष्मीकांत बेर्डे, विजय चव्हाण, सुहास जोशी, संजय मोने, सुकन्या कुलकर्णी यांसारख्या अनेक दिग्गजांचा कसलेला अभिनय राजापूरकरांनी जवळून अनुभवला आहे. या ठिकाणी रात्रीच्यावेळी होणऱ्या व्यावसायिक नाटकांचा आनंद लुटताना आवडत्या दिग्गज कलाकाराला जवळून बघण्याची अन् अनुभवण्याची संधी साधण्यासाठी शहरातूनच नव्हे तर, ग्रामीण भागातूनही त्या काळात बैलगाडीने वा मिळेल त्या वाहनाने नाहीच जमले तर, शहर परिसरातील रसिक पायी चालत येऊन नाटक पाहत असतं. त्या काळामध्ये राजापूर शहरामध्ये ‘राजापूरकर नाटक मंडळी’ या नावाची संस्था असल्याचेही सांगितले जाते. दरम्यान, कालपरत्वे झालेल्या बदलावांमध्ये श्री देव धूतपापेश्वर आणि (कै.) द. ज. सरदेशपांडे असे दोन खुले रंगमंच इतिहासजमा झाले आहेत. (कै.) द. ज. सरदेशपांडे खुला रंगमंच या ठिकाणाचे पालिकेने पार्किंग झोन उभारला असून, सद्यःस्थितीमध्ये या ठिकाणी आठवडा बाजार भरतो. श्री देव धूतपापेश्वर खुला रंगमंचही खासगी पार्किंग झोन झाला आहे. नाटकांच्या माध्यमातून राजापूरकरांची करमणूक करणारे खुले रंगमंचही संपुष्टात येऊन केवळ नावापुरतेच राहिले. अशा स्थितीमध्ये लोकांना करमणुकीचे साधन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राजापूर नगरपालिकेने तब्बल सतरा वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाची उभारणी केली आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

