नगरपंचायतीची स्थापना आणि निधीची गंगा

नगरपंचायतीची स्थापना आणि निधीची गंगा

Published on

फ्लॅश बँक---लोगो

-rat२९p६.jpg-
२५O०७३६९
गुहागर नगरपंचायत
-----
नगरपंचायतीची स्थापना
अन् निधीची गंगा


गुहागर ः नगरपंचायतीची तिसरी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. नगरपंचायत स्थापन झाल्यावर झालेल्या पहिल्या निवडणुकीत शहरवासीयांनी आमदार भास्कर जाधव यांच्या पदरात मतांचे माप टाकले होते. दुसऱ्या निवडणुकीत शहरवासीयांनी शहर विकास आघाडी आणि भाजपला कौल दिला. या दोन निवडणुकांमधील वातावरण परस्परविरोधी होते. आता तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत हाच मतदार कोणा एका राजकीय विचारधारेच्या मागे उभा राहिलेला दिसत नाही.

--मयुरेश पाटणकर, गुहागर
---

गुहागर नगरपंचायतीची निर्मिती झाली तेव्हा शहरातील वातावरण सुरुवातीला नगरपंचायतीच्या विरोधात होते. विकास नको, निधी नको आम्ही ग्रामपंचायतीमध्येच सुखी आहोत, अशी भावना होती. शासनाने जनतेला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. जनता ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही असे लक्षात आल्यावर अन्य आयुधांचा वापर शासनाने केला. तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री आमदार भास्कर जाधव शहरवासीयांना विकासाचा मुद्दा समजावून सांगत होते. २०१० च्या दरम्यान तालुकास्थानी असलेल्या शहराला नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी आदेश नव्हता. नगरपंचायत करायची असेल त्या शहराची लोकसंख्या १० हजारहून अधिक असली पाहिजे असा नियम होता. त्यावेळी गुहागर ग्रुप ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे ८ हजार होती. नगरपंचायत करण्यासाठी लोकसंख्येच्या निकषात गुहागर बसावे म्हणून आमदार जाधव यांनी असगोली गावालाही गुहागरसोबत जोडले. येथील गावकऱ्यांचा नगरपंचायतीमध्ये सहभागी होण्यास टोकाचा विरोध होत होता. तरीही जनतेच्या हितासाठी विरोधात जाऊनही नगरविकास राज्यमंत्री (तत्कालीन) भास्कर जाधव यांनी असगोलीसह गुहागर नगरपंचायत अस्तित्वाच आणली.
गुहागरच्या पर्यटन उद्योगाचा विकास, वाड्यापर्यंत रस्ते, शहर पथदिपांनी उजळणार, २४ तास पाणी अशा मुद्द्यावर ही निवडणूक लढवली गेली. शहरातील जनतेचा विरोध नगरपंचायतीचे वारे वाहू लागल्यावर मावळला. आपल्या गावाला शहरीपणाची ओळख देणाऱ्या नगरपंचायतीसाठी मतदारांनी आमदार जाधव यांच्या उमेदवारांच्या पदरात मतांचे दान टाकले. असगोली प्रभागातील लोक मात्र संतप्त होते. उमेदवारांना फिरू देत नव्हते. काही ग्रामस्थांनी थेट उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यासर्वांनी आमदार जाधव यांना विरोध म्हणून भाजप शिवसेना युतीचे नगरसेवक निवडून दिले. १७ नगरसेवकांच्या फौजेत भाजप शिवसेनेचे हे ४ नगरसेवक सोडले, तर शहरातील सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले. जयदेव मोरे हे गुहागर नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष झाले. स्नेहा वरंडे या प्रथम उपनगराध्यक्ष झाल्या.
नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचनांप्रमाणे गुहागरचा कायापालट करण्यास सुरुवात केली. शहरांतर्गत पायाभूत सुविधांच्या विकासकामांबरोबरच पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. ग्रामपंचायतीपेक्षा नगरपंचायतीद्वारे अधिक वेगाने शहराचा विकास होऊ शकतो ही धारणा जनतेच्या मनात पक्की व्हावी यासाठी हे प्रयत्न होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com