चिपळूण - प्लास्टिक मुक्तीचा संदेश

चिपळूण - प्लास्टिक मुक्तीचा संदेश

Published on

rat1p6.jpg-
07730
चिपळूण ः प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेतील एक क्षण.
----------

प्लास्टिकमुक्तीसाठी धावले चिपळूणकर
हाफ मॅरेथॉन ; १,८९५ धावपटू सहभागी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ : चिपळूण संघर्ष क्रीडा मंडळ आयोजित आणि चिपळूणकरांच्या सहकार्याने होणारी दुसरी चिपळूण हाफ मॅरेथॉन स्पर्धा रविवारी (ता. ३०) सकाळी उत्साहात झाली. राज्याबाहेरील आणि महाराष्ट्रातील तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील १ हजार ८९५ धावपटू यामध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धेतून चिपळूणकरांनी प्लास्टिकमुक्तीचा संदेश दिला आहे.
रविवारी सकाळी साडेसहा वाजता २१ किलोमीटर स्पर्धेला सुरवात झाली. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण बाजारपेठ, गोवळकोट कालुस्ते येथून परत येऊन रेल्वेस्टेशनमार्गे धावपटू परत आले. संपूर्ण मार्गावर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तैनात होते; धावपटूंना पाणी पुरवून प्रोत्साहित करत होते. या प्रसंगी चिपळूणचे आमदार शेखर निकम, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू अशोक शिंदे, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू असलम इनामदार, पंकज मोहिते, प्रो कबड्डी स्टार आदित्य शिंदे, संघर्ष क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सचिन कदम उपस्थित होते. स्पर्धेचे एअर मार्शल हेमंत भागवत, प्रसाद देवस्थळी (रत्नागिरी) आणि संध्या दाभोळकर हे ब्रँड अॅम्बेसेडर होते.
धावू प्लास्टिक कचरामुक्तीसाठी या पर्यावरणपूरक थीमवर ही स्पर्धा आधारित होती. थीम पार्टनर म्हणून सह्याद्री निसर्गमित्र संस्था कार्यरत असून, ही संस्था १९९२ पासून पर्यावरण संवर्धनासाठी काम करत आहे. मागील पाच वर्षांत संस्थेने २५० टन प्लास्टिक संकलित करून पुनर्वापरासाठी पाठवले आहे. स्पर्धकांनी बीब घेताना १०० ग्रॅम स्वच्छ प्लास्टिक जमा करण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमातून सहभागींच्या लकी ड्रॉमध्ये विजेत्यास स्मार्ट वॉच देण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संघर्ष क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सचिन कदम, स्पर्धा प्रमुख प्रसाद आलेकर, नयन साडविलकर, सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचे अध्यक्ष भाऊ काटदरे आणि रत्नागिरी जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव संदीप तावडे यांनी मेहनत घेतली.

चौकट
स्पर्धेचा निकाल
* पाच किलोमीटर (१६ वर्षे मुली)- हुमेरा सय्यद, अनुष्का खेराडे, देविका बने; १७ वर्षाखालील मुली- सिद्धी चिनकटे, वेदिका बामणे, वेदिका हरवडे; १४ वर्षे मुली- इच्छा राजभर, श्रेया बने, मृणाली खेराडे;१५ वर्षे मुली- निधी शिगवण, संगमी गुडेकर, रिया भानशे; १६ वर्षे मुले- साईप्रसाद वराडकर, अथर्व दवंडे, तन्वेज पालशेतकर; १७ वर्षे मुले- पृथ्वी राजभर, आयुष बर्गे, मनीष पालगे; १४ वर्ष मुले- आर्यन सुर्वे, मंथन दुदे, वेदांत खेराडे, सूरज तांबे, रवी कश्यप, आर्यन मेस्त्री.
* महिला खुला गट- ऐश्वर्या लोंढे, कोमल मोहिते, श्रावणी पवार; ४१ ते ५० वयोगट महिला- शगुप्ता पागरकर, वर्षा खानविलकर, मनीषा वाघमारे; ३१ ते ४० महिला- मनस्वी गुडेकर, स्नेहा साडविलकर, आदिती शिंदे; ४१ ते ५० महिला- अलमास मुलानी, मृदुला परकार, माधुरी शिवदे; ५१ ते ६० महिला- साधना धनवडे, श्रद्धा तानविडकर, वैशाली म्हात्रे. साठ वर्षावरील महिला- शालन रानडे, प्राची जोशी, अस्मिता वानकर; ५१ ते ६० महिला खुला- सुशीला विखारे, ज्योती दाढा, सरिता कर्वे.
* २१ किलोमीटर (५१ ते ६० वय महिला)- रत्नप्रभा पिसाळ, ४१ ते ५० वयोगट- कामिनी पटेल, मानसी मराठे, विभावरी सप्रे; महिला खुला गट- साक्षी जड्याळ, अमरिता पटेल, श्रेया पाटील, किरण साहू, सुरभी सावर्डेकर, अंजली सोमण.
* साठ वर्षावरील पुरुष खुला गट- निहुतराम विश्वकर्मा, संजय शिंदे, लक्ष्मण कांबळे; १४ ते ५० वयोगट- दीपक वरफे, महेश पवार, मयुरेश बेंडल; १४ ते ६० वर्षे वयोगट- भारत घोले, डॉ. सुनील निकम, ज्ञानेश्वर पवार; साठ वर्षावरील पुरुष गट स्थानिक- संजय पाटील, अजित कंभोज, राजेंद्र महाजन; ४१ ते ५० पुरुष- जयंत शिवदे, अनंत तनकर, शुभांदु बुरटे; ५१ ते ६० पुरुष- रणजीत कानबरकर, विठ्ठल रघाडे, भरत लोखंडे; पुरुष खुला गट- स्वराज्य जोशी, संदीप जोशी, यश शिर्के; ३१ ते ४० पुरुष गट- गणेश राजवीर, चेतन नानिजकर, उमेश खेडेकर; १० किमी पुरुष- सूरज झोरे, ओंकार बैकर, गणेश काले; ३१ ते ४० वयोगट पुरुष- अनिल कोरवी, देशराज मिना, धोंडीबा गिरतवाड.,
* २१ किलोमीटर- ६० वर्षावरील पुरुष- मृणाल विश्वास, उदय महाजन, अलेक्स कोयलो; ४१ ते ५० वयोगट- सुनील शिवने, पवन प्रजापती, अमित विचारे; ५१ ते ६० वयोगट- जगदाळे प्रभाकर, अनिल टोकरे, जॉर्ज थॉमस; ३० ते ४० वयोगट- समीर माळी, योगेश सानप, सुशीलकुमार भारतीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com