सबकुछ देवा भाऊच; जनता सुज्ञ
07832
सावंतवाडी ः शहरात सोमवारी पालकमंत्री नीतेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बाजूला भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, युवराज लखमराजे भोसले.
सबकुछ देवा भाऊच; जनता सुज्ञ
नीतेश राणे ः सावंतवाडीत भाजपतर्फे रॅली
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ ः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः मुख्यमंत्री राहिले आहेत. प्रत्येक फाईल शेवटी मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनेच मंजूर होते, हे त्यांनाही माहिती आहे. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवाच एका ठिकाणी अर्थमंत्री असलो, तरी निधीचे निर्णय मुख्यमंत्री घेतात हे जाहीर केलंय. त्यामुळे जर मग सबकुछ देवा भाऊच असतील, तर जनता सुज्ञ आहे, असे वक्तव्य राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी आज येथे केले.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोसले व नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांसह शहरातील व्यापारी व नागरिक यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भाजपतर्फे रॅली काढली. यावेळी ते बोलत होते. भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले, भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले उपस्थित होते. मंत्री राणे म्हणाले, ‘ज्या राजघराण्याने शहराला ओळख दिली, अनेक प्रकल्प राबवले त्या राजघराण्याचे ऋण फेडण्यासाठी ही संधी आहे. आज केंद्रात व राज्यात भाजपचीच सत्ता आहे. राज्यात मुख्यमंत्री आमचेच आहेत. मी पालकमंत्री आहे. त्यामुळे आम्ही कुठेही कमी पडणार नाही. त्यामुळे चारही शहरांचा जास्तीतजास्त विकास करण्याचा आमचा हेतू आहे. वैयक्तिक उणी धुणी, हेवेदावे काढण्याची ही निवडणूक नाही.’
ते म्हणाले, ‘राजघराण्यानं सावंतवाडीला सुंदरवाडी बनवलं. रस्ते, पाणी, मोती तलाव शहाराला कुणी दिला. इथली आरोग्य व्यवस्था, ड्रेनेज सिस्टीम, शैक्षणिक सुविधा या त्यावेळी राजघराण्यानं कोणतीही अपेक्षा न ठेवता हे सर्व दिलं. त्यांची ती दूरदृष्टी होती. आता त्यांच्याच कुटुंबातील एका सदस्याने प्रत्यक्ष निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे ही वेळ परतफेड करण्याची आहे. राजघराणं विकासाची जबाबदारी घेत असेल, तर त्याला सत्तेची जोडं देण आवश्यक आहे. आमच्या पॅनेलमध्ये कोणाही चुकीच्या माणसाला तिकीट दिलेलं नाही. त्यामुळे केवळ आरोप करून चालत नाही, पुरावे द्यावे लागतात. मी पालकमंत्री आहे, त्यामुळे तसं चुकीचं करण्याची कुणाची हिंमत नाही. चाबुक खिशातच असतो.’
-------------
जास्तीत जास्त जागा राजघराण्याचीच
विरोधकांकडून चुकीच्या पद्धतीने राज घराण्यावर टीका सुरू आहे. तलावाच्या जमिनीचा न्याय प्रविष्ठ विषय राजकारणासाठी वापरला जात आहे. शहरातील जास्तीत जास्त जागा ही राजघराण्याचीच आहे. त्यामुळे जर श्रद्धाराजेंच्या रूपात राजघराण्यातील व्यक्ती सत्तेत बसल्यास निश्चितच सगळे प्रश्न मिटतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

