फ्लॅशबॅक

फ्लॅशबॅक

Published on

-rat१p२५.jpg-
२५O०७८२७
राजापूर ः सायबाच्या धरणात झालेला पाणीसाठा.
---
फ्लॅशबॅक ------लोगो

सायबाचं धरण :
शतकापलीकडचा जलशक्तीस्तंभ

ब्रिटिशांनी १४७ वर्षापूर्वी कोदवली येथे बांधलेले सायबाचे धरण राजापूर शहराचा मुख्य जलस्रोत राहिले आहे. या धरणावरून विजेशिवाय अखंडितपणे राजापूर शहराला पाणीपुरवठा होत आहे. राजापूर शहरातील ब्रिटिशांच्या वास्तव्याच्या अनेक खाणाखुणा संपुष्टात आल्या असल्या तरी, कोदवली येथील सायबाचे धरण आजही ब्रिटिशांच्या दूरदर्शी अन् प्रगतशील कारभाराच्या स्मृती जागवत आहे. राजापूरच्या वास्तव्याच्या काळामध्ये १८७८ मध्ये बांधलेल्या सायबाच्या धरणाच्या माध्यमातून ब्रिटिशांच्या दूरदर्शीपणाची आठवण आजही राजापूरकरांना करून देत आहे.

- राजेंद्र बाईत, राजापूर
---
ब्रिटिशांच्या काळातील व्यापारउदीम, विविध सुधारणा आदी विविध स्तरावर अग्रेसर असलेल्या राजापूर शहरात नगरपालिकेची १४९ वर्षांपूर्वी (स्थापना वर्ष १८७६) स्थापना झाली. अर्जुना-कोदवली नदीच्या संगमावर वसलेल्या राजापूर शहराचा प्रशासकीय कारभार ब्रिटिशांच्या काळात स्थापन झालेल्या राजापूर नगरपालिकेतर्फे हाकला जात आहे. मात्र, ज्यांच्या काळामध्ये या नगरपालिकेची स्थापना झाली त्या ब्रिटिशांच्या येथील वास्तव्याच्या खाणाखुणा सांगणाऱ्या अनेक स्मृती केवळ कागदोपत्रीच राहिल्या आहेत; मात्र, ब्रिटिशांनी १८७८ मध्ये बांधलेले सायबाचे धरण आजही त्यांच्या दरदर्शी कारभाराच्या आठवणी आहे. तब्बल १४५ वर्षापूर्वी या धरणाचे बांधकाम झाले असून, दगडी स्वरूपाचे धरणाचे बांधकाम आहे. ३० मीटर लांबी आणि ४.५० मीटर उंची असलेल्या धरणाची माथा रुंदी तीन मीटर आहे. धरणातून फारसा कोणताही खर्च न करता नैसर्गिकरीत्या पाईपलाईनद्वारे गेल्या सुमारे १४५ वर्षापासून शहराला पाणीपुरवठा केले जात आहे. या धरणातून फारसा कोणताही खर्च न करता नैसर्गिकरीत्या पाईपलाईनद्वारे गेल्या सुमारे १४५ वर्षापासून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. राजापूर शहरासाठी नवीन जलस्रोत शोधण्याचा अन् निर्माण करण्याचे प्रयत्न झाले; मात्र, आजही सायबाचे धरण राजापूर शहराचा मुख्य जलस्रोत आहे. या धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी विजेचा वापर करावा लागत नाही.
नादुरूस्त धरण, जीर्णावस्थेमुळे ठिकठिकाणी फुटलेली पाईपलाईन आणि साचलेला गाळ यामुळे धरणातून पाणीपुरवठा होण्यावर मर्यादा येऊ लागल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी नव्या धरणाची उभारणी केली जात आहे. ५० मीटर लांबी आणि ६.४८ मीटर उंचीचे नवीन सायबाचे धरण बांधले जात असून, धरणातून शहरामध्ये पाणी आणले जाणाऱ्‍या पाण्याची पाईपलाईन १४ इंचाचे असणार आहे. या धरणामध्ये सुमारे १०३ सहस्र घनमीटर पाणीसाठा होईल, असे सांगितले जात आहे. राजापूरच्या वास्तव्याच्या काळामध्ये १८७८ मध्ये बांधलेल्या सायबाच्या धरणाच्या माध्यमातून ब्रिटिशांच्या दूरदर्शीपणाची आठवण आजही राजापूरकरांना करून देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com