चिपळूण ः चिपळुणात सकाळीच केंद्रावर रांगा
rat2p19.jpg
07984
चिपळूणः काविळतळी येथील आदर्श मतदान केंद्र.
rat2p16.jpg
07981
चिपळूण ः शहरातील विरेश्वर कॉलनी येथे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रमेश कदम यांचे अख्ख कुटुंब बूथवर ठाण मांडून बसले होते.
-----------
चिपळुणात सकाळीच केंद्रावर रांगा
४८ केंद्रावर मतदान; गोवळकोटमध्ये किरकोळ वादावादी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ः येथील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली. दाट धुके आणि गारवा असतानाही पहिल्या तासातच १० टक्केहून अधिक मतदान झाले. त्यानंतर कोवळी उन्हे अंगावर घेत मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या.
चिपळूण शहरात एकूण ४८ मतदान केंद्रे असून, बांदल हायस्कूल येथे आदर्श मतदान केंद्र तर मुरादपूर येथे सखी केंद्र उभारले होते. सखी मतदान केंद्रावर सर्व अधिकारी व कर्मचारी महिला होत्या. सकाळी साडेआठ वाजल्यानंतर मतदार मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडले. यामध्ये बांदल हायस्कूल, खेंड शाळा, युनायटेड हायस्कूल, गोवळकोट खतिजा स्कूल, महाराष्ट्र हायस्कूल आदी ठिकाणी मतदानासाठी मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. पहिल्या टप्प्यात नगराध्यक्षपदाचे उमेदवार रमेश कदम यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्राच्या पाचशे मीटर बाहेर विविध पक्षांचे बूथ लावण्यात आले होते. त्या बूथवर कार्यकर्त्यासह उमेदवारांचा परिवार उपस्थित होता. भाजपा नेते प्रशांत यादव, बळीराम मोरे, योगेश शिर्के व कार्यकर्ते प्रत्येक बूथला भेट देत होते. याबरोबर अन्य पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू होत्या. उमेदवार मतदान केंद्राच्या बाहेर थांबून मतदारांच्या गाठीभेटी घेत होते. निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे, सहाय्यक निवडणूक अधिकारी विशाल भोसले, तहसीलदार प्रवीण लोकरे, पोलिस निरीक्षक फूलचंद मेंगडे हे मतदान केंद्राना भेटी देऊन आढावा घेत होते.
शहरातील गोवळकोट रोड येथे बूथकेंद्रावर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची गर्दी झाल्याने पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. याच दरम्यान येथे किरकोळ बाचाबाचीचे प्रकारदेखील घडले. त्यामुळे पोलिस निरीक्षक मेंगडे हे येथे काही काळ ठाण मांडून होते याशिवाय शहरातील अन्य केंद्रावरदेखील उमेदवार मतदान केंद्राच्या परिसरात उभे राहिल्याने त्यांना देखील प्रशासनाकडून हटकण्यात आले.
चौक
मतदार भांबावले
या निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे सात उमेदवार व नगरसेवकपदाच्या २८ जागांसाठी तब्बल ११० उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे बहुतांशी केंद्रांवर दोन तर काही ठिकाणी तीन मतपेट्या होत्या. त्यामुळे निरक्षर मतदारांचा मतदानावेळी कहींसा गोंधळ उडाला. चिन्ह पाहून मतदान करणारे मतदार या प्रक्रियेत काहीसे गोंधळले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

