राज्यस्पर्धेसाठी पंच म्हणून निवड

राज्यस्पर्धेसाठी पंच म्हणून निवड

Published on

rat३p१.jpg-
२५O०८१८५
संकेता सावंत

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी
रत्नागिरीच्या संकेता सावंत पंच
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी ईगल तायक्वांदो अॅकॅडमीच्या प्रशिक्षिका संकेता सावंत यांची पंच म्हणून निवड झाली आहे. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर आयोजित ३५वी महाराष्ट्र स्टेट सीनिअर क्योरोगी तायक्वांदो चॅम्पियनशिप आणि ११वी महाराष्ट्र स्टेट सीनिअर पुमसे तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२५-२६ ही ५ ते ७ डिसेंबरला जिल्हा क्रीडा संकूल औसा रोड, लातूर येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी संकेता सावंत यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. अभ्युदय नगर येथील नगर परिषद बहुउद्देशीय सभागृहात चालणाऱ्या ईगल तायक्वांदो अॅकॅडमीमध्ये संकेता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मुलं या खेळाच प्रशिक्षण घेत असून, स्पर्धेमध्ये यश मिळवत आहेत. राज्यस्पर्धेसाठी पंच म्हणून निवड झाल्याबद्दल राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष आणि जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी तसेच ईगल तायक्वांदो अॅकॅडमीतर्फे अभिनंदन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com