दिवाळी अंकांमुळे वाचन संस्कृती वृद्धिंगत

दिवाळी अंकांमुळे वाचन संस्कृती वृद्धिंगत

Published on

08192

दिवाळी अंकांमुळे वाचन संस्कृती वृद्धिंगत

विनय सौदागर ः शिरोडा खटखटे ग्रंथालयात साहित्य कट्ट्याचा कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३ ः वाचन संस्कृती जोपासण्यात दिवाळी अंकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. शंभरहून जास्त वर्षांची परंपरा लाभलेल्या दिवाळी अंकानी अनेक लेखक प्रकाशात आणले. अजूनही अनेकांना संधी प्राप्त होत आहे, असे प्रतिपादन विनय सौदागर यांनी केले.

साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या सलग ६१ व्या मासिक कार्यक्रमात ते बोलत होते. दिवाळी अंकांची परंपरा ही आजगावचे सुपुत्र का. र. मित्र यांनी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. शिरोडा र. ग. खटखटे ग्रंथालयात आयोजित दिवाळी अंकाविषयीच्या चर्चेत सुरुवातीला सोमा गावडे यांनी दिवाळी अंकांचा इतिहास विस्तृतपणे कथन केला. गुळदुवे येथील ज्ञानदीप वाचनालयाचे कार्यवाह अरुण धर्णे हे ‘माहेर’ या दिवाळी अंकाविषयी बोलले. त्याचे मुखपृष्ठ व अंकातील ‘राधाकाकू’ आणि ‘प्रतिबिंब’ या कथा त्यांनी सविस्तरपणे सांगितल्या.
खटखटे ग्रंथालयाच्या ग्रंथपाल प्राची पालयेकर यांनी ‘कोकण मीडिया’ या कोकणच्या खाद्य संस्कृतीला वाहिलेल्या दिवाळी अंकाविषयी माहिती दिली. तसेच त्यातील ‘बांगडो माझ्या स्वप्नात येता’ ही अनुप्रिया प्रभूंची मालवणी कविता वाचून दाखवली. तिला प्रतिसादही चांगला मिळाला. सरोज रेडकर यानी ‘धनंजय’ दिवाळी अंकाची वैशिष्ट्ये कथन केली व त्यातील ‘पितृऋण’ ही कथा थोडक्यात सांगितली.
बावडेकर विद्यालयाच्या पर्यवेक्षक नीलम कांबळे यांनी ‘भाषा संस्कृती-बळी विशेषांक’ या भाषेची महती सांगणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण व संग्राह्य अंकाची माहिती दिली. तसेच एक अंक खटखटे ग्रंथालयाला भेट दिला.
--------------
‘सकाळ’च्या ‘संतुलित मन’चीही चर्चा
शेवटी कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी ‘सकाळ’च्या ‘संतुलित मन’ या अंकाविषयी माहिती दिली. जीवन सुखावह होण्यासाठी मनाचा अभ्यास आवश्यक असून ते संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे अंकातील लेखाचा आधार घेत ठामपणे सांगितले. ऋणनिर्देश करून सांगता करताना २५ डिसेंबरला पुढील कार्यक्रमात होणाऱ्या प्रेरणा साहित्य संमेलनाचे सर्वांना निमंत्रण दिले. कार्यक्रमाला यशवंत गिरी, एकनाथ शेटकर, अविनाश जोशी, गिरीधर राजाध्यक्ष, भालचंद्र दीक्षित, शेखर पणशीकर आणि अनिल निखार्गे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com