कणकवलीचे मतदान जिल्ह्यात सर्वाधिक
कणकवलीचे मतदान जिल्ह्यात सर्वाधिक
नगरपंचायत निवडणूक; प्रभाग दोनमध्ये पुढे, प्रभाग चौदामध्ये सर्वांत कमी
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ३ : येथील नगरपंचायतीच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत मंगळवारी (ता.२) सरासरी ७९.७१ टक्के एवढे जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले. यात प्रभाग २ मध्ये सर्वाधिक ८५.२९ टक्के मतदान तर सर्वांत कमी प्रभाग १४ मध्ये ७४.३६ टक्के मतदानाची टक्केवारी राहिली. कणकवली शहरात एकूण १३ हजार २७८ मतदारांपैकी १० हजार ५८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
कणकवलीत सर्वच प्रभागात चुरशीने मतदान झाले. त्यामुळे सकाळपासून सायंकाळ पर्यंत सर्व १७ प्रभागात मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत शहरातील १० हजार ५८४ मतदारांनी मतदान केले. आता २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. तोपर्यंत नगराध्यक्ष कोण होणार, आपल्या प्रभागात कुठला उमेदवार विजयी होणार तसेच भाजप आणि शहर विकास आघाडीला किती जागा मिळणार याबाबत लोकप्रतिनिधी, उमेदवार आणि मतदारांकडून अंदाज बांधले जात आहेत. गेले आठ दिवस सर्वच प्रभागातील मतदार पायाला भिंगरी लावून दिवसरात्र प्रचारात सक्रीय होते. मतदान संपल्यानंतर या उमेदवारांनी मोकळा श्वास घेतला. तर मतमोजणी पुढे गेल्याने सर्वच उमेदवारांकडून नाराजीही व्यक्त झाली.
शहरात प्रभाग तीन आणि नऊचा अपवाद वगळता दुरंगी लढती झाल्या. यात भाजपची यंत्रणा शिस्तबद्ध पद्धतीने आणि नियोजनानुसार काम करत असल्याचे चित्र होते. शहर विकास आघाडीच्या प्रचारामध्ये विस्कळीतपणा होता. भाजपच्या तुलनेत कार्यकर्त्यांचीही ताकद कमी असल्याचे चित्र होते. यापूर्वी कणकवली नगरपंचायतीची निवडणूक एप्रिल २०१८ मध्ये झाली होती. तर मे २०२३ मध्ये नगरपंचायतीचा कार्यकाळ संपला. त्यानंतर नगरपंचायतीवर प्रशासकीय राजवट होती. आता २१ डिसेंबरला निकाल लागल्यानंतर पुन्हा एका कणकवली नगरपंचायतीवर लोकनियुक्त प्रतिनिधी असणार आहेत. हे प्रतिनिधी आपल्याच पक्षाचे असावेत यासाठी भाजपकडून पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत जोरदार राजकीय मोर्चेबांधणी केली. तर शिंदे शिवसेनेचे नेते आमदार नीलेश राणे यांनी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला होता.
-----------------------
प्रभागनिहाय मतदान आणि टक्केवारी
*प्रभाग*मतदान*टक्केवारी
*प्रभाग १ *७६१*८४.७४
*प्रभाग २ *६६७*८५.२९
*प्रभाग ३ *४६३*७९.८३
*प्रभाग ४ *५२४*७७.९८
*प्रभाग ५ *६००*७५.८५
*प्रभाग ६ *६५०*८३.०१
*प्रभाग ७ *९२४*८२.२८
*प्रभाग ८ *६९७*८५.००
*प्रभाग ९ *६८४*७९.३५
*प्रभाग १० *५७१*७६.३४
*प्रभाग ११ *४९१*७४.६२
*प्रभाग १२ *७९५*८१.५४
*प्रभाग १३ *५९९*७६.७९
*प्रभाग १४ *५२५*७४.३६
*प्रभाग १५ *३८६*७५.१०
*प्रभाग १६ *६९३*७९.४७
*प्रभाग १७ *५५४*७७.५९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

