वैष्णवी फुटक हिला राणी लक्ष्मीबाई पुरस्कार
-rat३p३.jpg-
२५O०८१८७
डॉ. उपेंद्र किंजवडेकर, वैष्णवी फुटक, डॉ. गजानन केतकर, अनिरुद्ध ठाकूर, प्रज्ञेश देवस्थळी,
पुरुषोत्तम काजरेकर, प्रशांत आचार्य, हृषिकेश सरपोतदार, कांचन चांदोरकर, अतुल पळसुलेदेसाई.
--------
वैष्णवी फुटक हिला राणी लक्ष्मीबाई पुरस्कार
माधव हिर्लेकर ः ‘कऱ्हाडे ब्राह्मणसंघा’चे वार्षिक पुरस्कार जाहीर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मणसंघाने आपले वार्षिक पुरस्कार जाहीर केले. राणी लक्ष्मीबाई पुरस्कार वैष्णवी फुटक (रत्नागिरी), धन्वंतरी पुरस्कार डॉ. गजानन केतकर (साखरपा), आदर्श पौरोहित्य पुरस्कार वेदमूर्ती अनिरुद्ध ठाकूर (नाटे) यांना जाहीर झाला आहे. आचार्य नारळकर पुरस्कार प्रज्ञेश देवस्थळी (आडिवरे), आदर्श कीर्तनकार पुरस्कार पुरुषोत्तम काजरेकर (कुडाळ) यांना देण्यात येणार आहे. उद्योजक पुरस्कार प्रशांत आचार्य व हृषिकेश सरपोतदार (रत्नागिरी) आणि उद्योगिनी पुरस्कार कांचन चांदोरकर (लांजा) व कृषीसंजीवन पुरस्कार अतुल पळसुलेदेसाई (व्हेळ, लांजा) यांना देऊन सन्मानित केले जाणार आहे.
पुरस्कारांची माहिती संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर व उपाध्यक्ष मानस देसाई यांनी दिली. पुरस्कार वितरण सोहळा येत्या १४ डिसेंबरला दुपारी ३.३० वा. राणी लक्ष्मीबाई सभागृहात होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजवडेकर उपस्थित राहणार असून, स्वास्थ्य : नवी पिढी-नवी आव्हाने यावर ते व्याख्यान देतील.
वैष्णवी फुटक ही रा. भा. शिर्के प्रशालेत नववीत शिकत आहे. ती राष्ट्रीय खो-खो खेळाडू आहे. १४ वर्षांखालील शालेय स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देण्यात तिचे योगदान आहे. राज्यस्तरीय स्पर्धा तिने गाजवल्या असून, या कामगिरीबद्दल तिला राणी लक्ष्मीबाई पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. १९७५पासून साखरप्यासारख्या दुर्गम भागांत वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. गजानन केतकर यांना धन्वंतरी पुरस्कार दिला जाईल.
श्री महाकाली इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक प्रज्ञेश देवस्थळी हुशार व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता सहकार्य, वैद्यकीय उपचारांसाठी मदत करतात. गेली ३५हून अधिक वर्षे अनेक उत्सवामध्ये कीर्तने करणाऱ्या पुरुषोत्तम काजरेकर यांना आदर्श कीर्तनकार पुरस्कार दिला जाणार आहे. आर्यक सोल्युशन्स कंपनीद्वारे छोट्या दुकानदारांपासून ते १० देशांमध्ये विविध सॉफ्टवेअर सेवा देणाऱ्या प्रशांत आचार्य व हृषिकेश सरपोतदार या दोघांना उद्योजक पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. जोशी फूड्सच्या माध्यमातून ५० महिला, पुरुषांना रोजगार देऊन आर्थिक सक्षम करणाऱ्या संचालिका कांचन चांदोरकर यांना उद्योगिनी पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. शेतकरी अतुल पळसुलेदेसाई कुटुंबाच्या मदतीने कलिंगड, काकडी, भाजीपाला शेती करत आहेत. त्यांना कृषीसंजीवन पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
--------
चौकट १
अहिताग्नी अनिरूद्ध ठाकूर यांचा सन्मान
वेदमूर्ती, अहिताग्नी अनिरूद्ध ठाकूर (नाटे) यांनी मार्च १९९९ मध्ये बार्शी (सोलापूर) येथे ३८५ दिवस गवामयन संवत्सर सत्रामध्ये पत्नीसह सहभाग घेतला. एक वर्ष चालणाऱ्या यज्ञामध्ये गाईच्या तुपाच्या, पुरोडाशाच्या व सोमवल्लीच्या रसाच्या आहुती दिल्या. त्यानंतर ते अग्नी घेऊन नाटे गावी परतले. जून २००१ पासून आजगायत अग्नीहोत्री सकाळ-संध्याकाळी होम सुरू आहे. हे व्रत स्वीकारताना सर्व कडक नियम ते पाळत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना आदर्श पौरोहित्य पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

