-श्री कर्णेश्वर देवस्थान महोत्सव

-श्री कर्णेश्वर देवस्थान महोत्सव

Published on

-rat३p१४.jpg-
२५O०८२२९
संगमेश्वर ः कसबा येथील प्रसिद्ध कर्णेश्वर मंदिर.
----
कर्णेश्वर मंदिरात रंगणार कला संगीत महोत्सव
कथ्थक, भरतनाट्यमचा आविष्कार; पखवाज वादनाची मेजवानी
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ३ ः ऐतिहासिक प्राचीन वारसा असलेल्या कसबा (संगमेश्वर) येथील श्री कर्णेश्वर मंदिर प्रांगणात १२, १३ आणि १४ डिसेंबर रोजी श्री कर्णेश्वर कला-संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालय यांच्या सौजन्याने आणि श्री कर्णेश्वर देवस्थान व कलांगण संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील नृत्यगुरू श्रुती आठल्ये (कथ्थक) आणि प्रणाली तोडणकर (भरतनाट्यम्) यांसह त्यांचे सहकारी यांचे कथ्थक आणि भरतनाट्यम् या दोन नृत्यशैलींच एकत्रित दर्शन पहिल्या दिवशी १२ डिसेंबर रोजी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. १३ रोजी गांधर्व महाविद्यालयाच्या पखवाज अलंकार परीक्षेत देशभरात प्रथम क्रमांक प्राप्त सुप्रसिद्ध पखवाज वादक प्रथमेश तारळकर यांची पखवाज एकल वादन मैफल आयोजित केली आहे. मंदार दीक्षित (संवादिनी), विशारद गुरव (गायन), रोहित धुरी व अमित कामतेकर (पखवाज) यांची साथ त्यांना मैफलीत लाभणार आहे. १४ ला महोत्सवाचा कळस ज्येष्ठ गायक स्व. जितेंद्र अभिषेकी यांचे नातू आणि प्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी यांचे चिरंजीव अभेद शौनक अभिषेकी यांच्या गायनमैफलीने चढवला जाईल. त्यांच्या साथीला तबला : प्रशांत पांडव, संवादिनी : वरद सोहनी आणि पखवाज : प्रथमेश तारळकर यांच्या साथीने मैफलीची आणि महोत्सवाची सांगता होईल. तिन्ही दिवशी रात्री ९ वाजता या कार्यक्रमाला प्रारंभ होईल.
या महोत्सवात नृत्य, वादन, गायन यासोबत महोत्सवाच्या तिन्ही दिवशी मंदिराच्या प्रांगणात सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे आणि डी-कॅड कॉलेज, देवरूखमधील विद्यार्थ्यांचे चित्र, शिल्पकला प्रदर्शन आयोजित केले आहे. संपूर्ण महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य आहे.
-----
चौकट
सुती धाग्यांची कर्णेश्वरी साडी
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी धनंजय प्रभुघाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कर्णेश्वरी साडीचे प्रकाशन मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपजिल्हाधिकारी डॉ. आसावरी संसारे, तहसीलदार अमृता साबळे आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिका संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या दोन्ही काठांवर कर्णेश्वर मंदिरावरील निवडक नक्षी साकारण्यात आली आहे. कोकणात पूर्ण सुती कपडे जास्त योग्य ठरतात म्हणून ही साडी सेंद्रिय कापसाच्या सुती धाग्यांनी विणलेली आहे. एक साडी विणायला किमान पाच तास लागतात.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com