क्रीडा स्पर्धेचे उद्‍घाटन

क्रीडा स्पर्धेचे उद्‍घाटन

Published on

वांझोळे हायस्कूलमध्ये
क्रीडा स्पर्धेचे उद्‍घाटन
साडवली ः वांझोळे येथील केदारलिंग ग्रामस्थ मंडळ संचलित शिवाजी माध्यमिक विद्यालय येथे वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात झाल्या. स्पर्धेच्या उद्‍घाटनाला संस्थाध्यक्ष अनिल पंदेरे, सचिव शेडगे, सदस्य मनोहर शेडगे, गावकर जयवंत शिवगण, माजी मुख्याध्यापक दीपक लिंगायत, डॉ. श्रीनिवास मुंडे, मुख्याध्यापक संजय कोरे उपस्थित होते. दिवसभर विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडाप्रकारांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, स्पर्धात्मकता व संघभावनेची जाणीव दृढ झाल्याचे मान्यवरांनी सांगितले.

नवनिर्माणतर्फे
पोस्टर मेकिंग स्पर्धा
संगमेश्वर ः येथील नवनिर्माण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत एड्स जनजागृतीपर पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून ४२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला प्राचार्या डॉ. संजना चव्हाण उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना एड्सविषयक जनजागृतीचे विचार आत्मसात करून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. प्रा. संतोष खरे यांनी विद्यार्थ्यांना एड्स प्रतिबंध, जागरूकता व या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. पोस्टर स्पर्धेनंतर महाविद्यालयातून बाजारपेठ, बसस्थानक या मार्गावर सामाजिक जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर घोषणा देत नागरिकांमध्ये एड्सविषयी सजगता निर्माण केली.

झोंबडी-काजळीवाडीत
‘हँडवॉश’चे वाटप
गुहागर ः तालुक्यातील झोंबडी ग्रामपंचायतीच्यावतीने काजळीवाडी येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या वेळी सर्व ग्रामस्थांना सरपंच अतुल लांजेकर यांच्या हस्ते हॅण्डवॉशचे वाटप करण्यात आले. या वेळी तळवली प्राथमिक आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिम कुमार कांबळे, समुदाय आरोग्य अधिकारी राजेश मोहिते, आरोग्य निरीक्षक मदन जानवळकर, आरोग्यसेवक वैभव जाधव, विकास दुपटे, अजय हळये आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com