निकाल लांबल्याने उत्साहावर पाणी
निकाल लांबल्याने उत्साहावर पाणी
चिपळूण पालिका ; गुलाल, वाद्यांची ऑर्डर रद्द
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ ः चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत विजयाची खात्री असलेल्या उमेदवारांनी गुलाल, वाद्यपथक यांची अगोदरच ऑर्डर दिली होती; मात्र निकाल पुढे गेल्यानंतर गुलाल आणि वाद्यपथकाची ऑर्डर रद्द करण्यात आली. न्यायालयाच्या निर्णयाने त्यांच्या आनंद साजरा करण्याच्या इच्छेवर पाणी पडले.
जिल्ह्यातील नगरपंचायत व नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २) मतदान झाले. मतमोजणी पुढे ढकलल्याने उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची धाकधूक वाढली आहे. या निर्णयाबाबत उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. ज्या उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना विजयाची खात्री आहे त्यांनी विजयी जल्लोषाची तयारी केली होती. मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच उमेदवारांचे कार्यकर्ते मतदानासाठी मतदारांना बाहेर काढत होते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. चिपळूण शहरातील स्थानिक ढोलपथक आरक्षित करण्यात आले होते. कऱ्हाडमधून रथ मागण्यात आले होते. विजयी उमेदवाराची कोणत्या गाडीतून विजयी मिरवणूक काढायची, ती गाडी कशी सजवायची याचेही नियोजन करण्यात आले होते; मात्र न्यायालयाच्या निर्णयावर या उत्साहावर पाणी फेरले.
---
कोट
मतदानानंतर मोजणीनंतरचा कालावधी खूप मोठा आहे. राजकीय पक्षांचे नेते, उमेदवार आणि कार्यकर्ते यांच्या मनावर मतमोजणी आणि निकालाचे दडपण राहणार आहे. निकाल लांबणीवर पडल्याने कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. ज्या ठिकाणी कुठलीही निवडणूक पुढे ढकलण्यात आली नव्हती तिथे मतमोजणी ठरलेल्या वेळेत व्हायला हवी होती. तरीही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर आहे.
– रमेश कदम, माजी आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

