कोकण
-शृंगारतळीत स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे उदघाटन
शृंगारतळीत स्पर्धा परीक्षा
वाचनालयाचे उद्घाटन
गुहागर, ता. ४ : तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती, मार्गदर्शन व दर्जेदार अभ्यास सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शृंगारतळी येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्पर्धा परीक्षा वाचनालय सुरू करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन समाजसेवक संतोष जैतापकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी शेखर भिलारे, संस्थेचे अध्यक्ष संतोष सोलकर, पांडुरंग पाते, मंगेश गोरिवले आदी उपस्थित होते.

