खेडमध्ये मतदानाचा टक्का घसरला

खेडमध्ये मतदानाचा टक्का घसरला

Published on

खेडमध्ये मतदानाचा टक्का घसरला
उमेदवार अस्वस्थ ; आरोप-प्रत्यारोपांना कंटाळले मतदार
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ३ : खेड पालिकेची निवडणूक प्रक्रिया झाली; मात्र या निवडणुकीत खेडमध्ये मतदानाचा टक्का घसरलेला दिसून आला. आरोप-प्रत्यारोप, नेत्यांचे स्वतःच्या फायद्यासाठी विविध पक्षात मारलेल्या कोलांट्या याला कंटाळलेल्या खेडमधील मतदारांनी उमेदवारांना चपराकच दिली असल्याचे लक्षात येते.
खेड शहराचे एकूण मतदान १३ हजार ९९५ इतके असून, यापैकी ८७५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे ६२.५३ टक्के मतदान झाले आहे. मतदारांची बदललेली मानसिकता आणि प्रशासनाचे जागृतीसाठी होणारे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे यावरून दिसून येत आहे.
काल मतदानाच्या दिवशी नागरिक आपल्या दैनंदिन कामातच व्यस्त होते. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची धावपळ दिसत होती; परंतु मतदारांमध्ये मतदानासाठीचा उत्साह दिसत नव्हता.
यापूर्वी मतदारांना बाहेर काढण्यापासून ते बाहेरच्या मतदारांना आणण्यापर्यंत आधीपासूनच फिल्डिंग लागत होती. त्यासाठी कार्यकर्त्यांवर टाकलेली जबाबदारी, त्यांची धावपळ, ग्रुपने मतदानासाठी बाहेर पडण्याचा उत्साह कुठेच दिसत नव्हता; परंतु आता विकासकामे किंवा उमेदवाराचा स्वच्छ चेहरा हा निकष मागे पडताना दिसत आहे. स्थानिक पातळीवरील निवडणुकीत केवळ मिळणारी आश्वासने आणि निवडून आल्यानंतर त्या उमेदवाराने दिलेल्या आश्वासनांकडे केलेले दुर्लक्ष यामुळे काही मतदार घरी असूनही मतदानासाठी बाहेर पडले नाहीत. राजकारणाच्या घसरलेल्या पातळीमुळे मतदान करण्याची इच्छा होत नाही, अशा अनेकांच्या प्रतिक्रिया आहेत.
----
चौकट १
प्रभागनिहाय आकडेवारी
प्रभाग क्र. १ मध्ये सगळ्या कमी ५०.५१ टक्के मतदान झाले तर प्रभाग क्र. ५ मध्ये सगळ्या जास्त ७४.४२ टक्के मतदान झाले आहे. प्रभागातील मतदानाची आकडेवारी अशी प्रभाग १ : एकूण मतदार - १९०७ त्यापैकी ९७१ मतदान झाले. प्रभाग क्र. २ : एकूण मतदार - ११३५ त्यापैकी ७०४ मतदान , प्रभाग क्र. ३ : एकूण मतदार - १३१७ त्यापैकी ७८५, प्रभाग क्र. ४ : एकूण मतदार - ११०० त्यापैकी ६३२, प्रभाग क्र. ५ : एकूण मतदार - ११७३ त्यापैकी ८७३, प्रभाग क्र. ६ : एकूण मतदार - १३५८ त्यापैकी ८८१, प्रभाग क्र. ७ : एकूण मतदार - १६७४ त्यापैकी ११२६, प्रभाग क्र. ८ : एकूण मतदार - १४१५ त्यापैकी ९१९, प्रभाग क्र. ९ : एकूण मतदार - १४२९ त्यापैकी ९८२, प्रभाग क्र.१० : एकूण मतदार - १४८७ त्यापैकी ८७८ मतदान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com