पाणी योजनेसाठीच्या ब्लास्टिंगने दगड घरावर

पाणी योजनेसाठीच्या ब्लास्टिंगने दगड घरावर

Published on

-rat३p३०.jpg-
२५O०८३०५
चिपळूण ः दगड घरावर उडत असल्याने जमलेले नागरिक.
-rat३p३२.jpg-
२५O०८३११
बायपास मार्गावर उक्ताड येथे केलेली खोदाई.
-----
‘ब्लास्टिंग’ने हादरला उक्ताडचा परिसर
पाणी योजनेसाठीचे काम ; अनेक घरांवर दगड, नागरिक संतप्त, पवानगी नसल्याचे उघड
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३ : गुहागर बायपास मार्गावर उक्ताडनजीक ग्रॅव्हिटीच्या पाणी योजनेसाठी विनापरवाना ब्लास्टिंग केले आहे. सुरुंग लावल्याने त्याचे दगड उक्ताड कानसेवाडी भागातील घरांवर पडल्याने येथील नागरिक थेट बायपास मार्गावरील सुरुंग लावलेल्या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी संबंधित ठेकेदारास रोखले. या वेळी संबंधित ठेकेदाराकडे सुरुंग लावण्याची कोणतीच परवानगी नसल्याचे उघड झाले आहे.
शहरात सध्या ग्रॅव्हिटीच्या पाणीयोजनेचे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. गुहागर बायपास रस्त्याच्या साईडपट्टीलगत या पाणीयोजनेचे पाईप टाकण्यात येत आहेत. त्यासाठी चर खोदण्यात आला आहे; मात्र, काही ठिकाणी कातळ लागल्याने संबंधित ठेकेदाराने त्या ठिकाणी ब्रेकरचा वापर करण्याऐवजी थेट ब्लास्टिंग केले आहे. गेले तीन-चार दिवस या भागात सुरुंग लावण्यात येत आहेत; मात्र, आज दुपारी या ठिकाणी सुरुंग लावल्यानंतर काही दगड उडून उक्ताड कानसेवाडीतील मंगेश भोसले, रसिक भोसले, चव्हाण यांच्या घरावर दगड पडले. यामुळे येथील नागरिक थेट बायपास रस्त्यावर आले व संबंधित ठेकेदारास धारेवर धरले. परवानगी नसताना ब्लास्टिंग लावण्यात कुणी सांगितले? असा जाब विचारला. या वेळी संबंधित ठेकेदाराने यापुढे ब्लास्टिंग करणार नाही, असे आश्वासन दिले. याची दखल आता पालिकेने घेतली असून, नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली आहे.
----------
चौकट ः
ठेकेदाराला नोटीस
पाणीयोजनेची पाईपलाईन टाकणाऱ्‍या संबंधित ठेकेदाराला नगर परिषदेने खोदाईसाठी ब्लास्टिंगची कोणतीही परवानगी दिलेली नाही; मात्र, तरीही ब्लास्टिंग झाल्याची दखल घेत तत्काळ संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे. आता संबंधित ठेकेदाराकडून पुन्हा अशा प्रकारचे ब्लास्टिंग होणार नाही, असे कबूल केल्याचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रोहित खाडे यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com