चक्कर किंवा गरगरणे
लोगो-----------आरोग्यभान ः वैयक्तीक - सार्वजनिक
(२८ नोव्हेंबर टुडे ४)
चक्कर किंवा गरगरणे
एक फिजिशियन म्हणून रुग्ण तपासताना चक्कर येणे, गरगरणे, भिरभिरणे या तक्रारी घेऊन रुग्ण बऱ्याचदा येतात. अंथरुणातून उठल्यावर अचानक डोकं गरगरणे, संपूर्ण खोली गोल फिरणे, मळमळणे, तोल जाणे, डोकं हलले की, गरगरणे, खाली पडतोय असे वाटणे अशा तक्रारी असलेल्या रुग्णांची संख्या रोज वाढत आहे.
- rat४p१.jpg -
P25O08365
- डॉ. सुनील कोतकुंडे
-----
व्हर्टिगो (Vertigo) किंवा चक्कर येणे ही भारतातील एक सर्वसामान्य आणि महत्त्वाची सार्वजनिक आरोग्यसमस्या आहे. योग्य निदानाअभावी रुग्णाला आणि कुटुंबाला बराच त्रास सहन करावा लागतो म्हणूनच त्याबद्दल आज जाणून घेऊया.
समस्येचे प्रमाण
* व्यापकता- भारतात सुमारे २० ते ३० टक्के लोकांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी व्हर्टिगोचा अनुभव येतो.
* भारतात अंदाजाने १८ कोटी लोक संतुलन व चक्करच्या विकारांनी ग्रस्त आहेत.
* महिलांमध्ये हे प्रमाण पुरुषांपेक्षा थोडे जास्त आढळून येते.
* ज्येष्ठांमध्ये म्हणजे ६०च्या पुढील वयोगटात हे प्रमाण इतरांपेक्षा जास्त आढळते.
- परिणाम ः
* अपघात आणि दुखापती- चक्कर आल्यामुळे तोल जाऊन पडण्याची शक्यता विशेषतः वृद्ध लोकांमध्ये वाढते.
* दैनंदिन जीवनावर बंधने -चक्करच्या अनुभवामुळे दैनंदिन कामे, जसे की वाहन चालवणे, काम करणे, चालणेदेखील कठीण वाटू शकते. यामुळे जीवनाचा दर्जा खालावतो व इतरांवर अवलंबून राहावे लागते.
* मानसिक परिणाम- वारंवार व्हर्टिगोच्या समस्यांमुळे आत्मविश्वास कमी होतो व सतत आरोग्याची चिंता सतावू शकते.
- कारणे ः
* व्हर्टिगो हे एक लक्षण आहे, आजार नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात
* कानाचे अंतर्गत विकार - सर्वसाधारण तोल सावरण्याचा आजार ( BPPV), कानाच्या आतील भागात दोष (Meniere’s disease), कानाचा नसांचा दोष(Vestibular Neuritis).
* मेंदूचा विकार जसे की, स्ट्रोक व अर्धशिशी किंवा मायग्रेन
* हृदयाची समस्या, उच्च रक्तदाब
* काही औषधांचे दुष्परिणाम.
विविध कारणे जबाबदार असल्याने प्रसंगी व्हर्टिगोचे योग्य निदान होण्यास विलंब होतो व रुग्ण योग्य निदान व उपचाराअभावी विविध दवाखान्याच्या चकरा मारत राहतो म्हणूनच आपण व्हर्टिगोबद्दल अधिक माहिती घेऊया.
व्हर्टिगोची लक्षणे ः
* फिरल्याची भावना : आपण स्वतः किंवा आजूबाजूचे वातावरण फिरत आहे असे वाटणे.
* असंतुलन- तोल जाणे किंवा एका दिशेने खेचल्यासारखे वाटणे.
* झुकण्याची भावना – खाली पडतोय किंवा झुकतोय असे वाटणे.
* मळमळ किंवा उलटीसारखे वाटणे
* डोळ्यांच्या असामान्य हालचाली किंवा डोळे अनैसर्गिकरीत्या हलणे.
* कानात सतत गुणगूण, भुणभुण आवाज येणे किंवा ऐकू कमी होणे.
* घाम येणे
व्हर्टिगो स्वतंत्र आजार नाही. यामुळे योग्य निदान करून त्याचे मूळ कारण शोधणे महत्त्वाचे ठरते.
- निदान करण्यासाठी
* रुग्णाची तपशीलवार माहिती घेणे गरजेची ठरते.
* लक्षणांबद्दल तपशील जसे की, चक्करचा कालावधी, किती वारंवार येते, कोणत्या परिस्थितीमुळे, डोक्याची कोणत्या विशिष्ट हालचालीने चक्कर सुरू होते इत्यादी.
* इतर लक्षणे जसे ऐकू कमी येणे, कानात आवाज येणे, डोकेदुखी, मळमळ/उलटी
* इतर काही आजार (उदा. मधुमेह, उच्च रक्तदाब) किंवा डोक्याला दुखापत इत्यादी.
- शारीरिक तपासणी
* संतुलन आणि मज्जासंस्थेची तपासणी, चालण्याची पद्धत
* डोळ्यांच्या हालचालींचे निरीक्षण व काही विशिष्ट चाचण्या
- विशेष चाचण्या
* डोक्याची आवेग चाचणीत आतील कानाच्या कार्याचे मूल्यांकन केले जाते.
* वेस्टिब्युलर तपासणीमध्ये आतील कानातील यंत्रणेचा संतुलनावर होणारा परिणाम तपासला जातो.
* श्रवणचाचणीत ऐकण्याची क्षमता तपासली जाते
- इमेजिंग चाचण्यामध्ये
व्हर्टिगोचे कारण मज्जासंस्थेशी (उदा. मेंदूतील समस्या, स्ट्रोक) संबंधित असल्याची शंका असल्यास CT/MRI करून ते तपासले जाते. व्हर्टिगोचे नेमके कारण शोधण्यासाठी न्यूरोलॉजिस्ट (Neurologist) किंवा ईएनटी (ENT) तज्ज्ञ यांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
- विशिष्ट उपचार
* तोल सावरण्यासाठी व्यायाम उपचार ः सौम्य तोल ढलण्यावर हा सर्वात प्रभावी उपचार आहे. यात डोक्याचे विविध हालचाल व व्यायाम करून तोल सावरण्यास मदत होते. हे नाक, कान, घसाचे डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्ट करून घेतात.
* वेसटिब्युलर रिहॅबिलिटेशन थेरपी किंवा पुनर्वसन : तोल सुधारण्यासाठी आणि चक्कर कमी करण्यासाठी विशेष शारीरिक व्यायाम नाक, कान, घसाचे डॉक्टर करून घेतात.
- औषधोपचार
कानाच्या आतील भागाच्या जंतूसंसर्ग कमी करण्यासाठी तसेच दुखणे कमी करण्यासाठी औषधे दिली जातात तसेच मळमळ किंवा उलट्यांची औषधे किंवा सूज कमी करणारी औषधे वेस्टिब्युलर न्युरिटिसमध्ये वापरली जातात. मेनिएर रोगासाठी वाढीव द्राव कमी करणारी औषधे व मायग्रेन किंवा अर्धशिशीसाठी वेदनाशामक औषधे दिली जातात.
- जीवनशैलीतील बदल
* धैर्याने संयमाने घ्या -चक्कर आल्यास थांबा आणि थोडा वेळ शांत बसा किंवा झोपा.
* हळूहळू हालचाल करा: डोक्याला किंवा शरीराला जोराचा झटका देणे टाळा.
* शरीराचे निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेसे पाणी प्या.
* मळमळ टाळण्यासाठी आल्याचा तुकडा तोंडात चघळून बघा
- महत्त्वाची सूचना ः
व्हर्टिगोचे प्रमाण बघता त्याचा दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम आणि येणाऱ्या अडचणी बघता याबद्दल जनजागृती आवश्यक आहे. Vertigo प्रसंगी गंभीर आरोग्यसमस्येचे लक्षण असू शकते. त्यामुळे, तुम्हाला वारंवार व्हर्टिगोचा त्रास होत असल्यास किंवा तोल सावरता येत नसल्यास, बोलण्यात अडथळा येत असल्यास किंवा नवीन किंवा तीव्र डोकेदुखी यांसारखी काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वेळीच निदान झाल्यास योग्य उपचार होऊ शकतात, हे जाणा.
(लेखक घरडा अभियांत्रिकी महाविद्यालय, लवेल येथे प्राध्यापक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

