''कोहिनूर रत्नागिरी हॉटेल मॅनेजमेंट'' विजेता
swt42.jpg
08410
पिंगुळी : विजेत्या कोहिनूर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, रत्नागिरीला गौरविताना डॉ. गुरुनाथ पंडित, माला खारकर, अमोल राऊळ, अमित गावडे व इतर मान्यवर. (छायाचित्र : अजय सावंत)
‘कोहिनूर रत्नागिरी हॉटेल मॅनेजमेंट’ विजेता
पिंगुळीतील स्पर्धा ; पाटकर वर्दे कॉलेज सॅटेलाईट सेंटरचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ : चिकित्सक समूहाचे पाटकर वर्दे कॉलेज सॅटेलाइट सेंटर कुडाळ-पिंगुळी यांच्यावतीने आयोजित विविध राज्यस्तरीय पातळीवर झालेल्या स्पर्धेचे विजेतेपद रत्नागिरी येथील कोहिनूर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटने पटकावले. त्यांना चषक देऊन गौरविण्यात आले. उपविजेतेपद गोवा एन्विरोस्किल कॉलेजने मिळविले.
पाटकर वर्दे कॉलेज सॅटेलाइट सेंटर, पिंगुळी यांच्यावतीने महाराष्ट्र आणि गोव्यातील हॉटेल व्यवस्थापन विद्यार्थ्यांसाठी हॉटेल क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करण्याच्या उद्देशाने विविध स्पर्धांचे आयोजन २ ते ३ डिसेंबर या कालावधी सॅटेलाइट सेंटर हिलट्रीट पिंगुळी येथे केले होते. विविध स्पर्धेंत सीआयएचएम कोल्हापूर कॉलेजने ‘लक्षवेधी कॉलेज’ या चषकावर आपले नाव कोरले. त्यांना चषक देऊन गौरविण्यात आले. बेस्ट कलीनरी कॉलेज म्हणून कोहिनूर कॉलेज ऑफ रत्नागिरीला गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण कार्यक्रम चिकित्सक समूहाचे सचिव डॉ. गुरुनाथ पंडित, मुख्य शिक्षण अधिकारी डॉ. माला खारकर, शेफ इशिजोत सुरी, भूषण दुगाडे, अद्वैत नेवगी, अमोल राऊळ, पाटकर वर्दे कॉलेज, मुंबई समन्वयक नोएल फर्नांडिस, पाटकर वर्दे महाविद्यालय, कुडाळ समन्वयक अमित गावडे, प्रा. रोशन मोहंती, प्रा. देवांश देसाई, शेफ क्युरी फर्नांडिस, शशांक आमरे, भावेश म्हाणपणकर, दीपिका शर्मा, प्रा. प्रसन्न लाड, कौस्तुभ नाईक आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. पंडित यांनी मार्गदर्शन केले. तसेच विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेस गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, चिपळूण, आलिबाग, दोडामार्ग, कऱ्हाड, सावर्डे येथून तब्बल १७ नामांकित महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला. पाटकर वर्दे कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी अँड कॅटरिंग सेटलाइट सेंटर पिंगुळीतर्फे अकरावी व बारावीच्या मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

