''रवळनाथ''तर्फे पेन्शनर्सना ''जीवन प्रमाणपत्र'' सुविधा

''रवळनाथ''तर्फे पेन्शनर्सना ''जीवन प्रमाणपत्र'' सुविधा

Published on

swt44.jpg
08412
डी. के. मायदेव

‘रवळनाथ’तर्फे पेन्शनर्सना
‘जीवन प्रमाणपत्र’ सुविधा
डी. के. मायदेवः सभासदांना कागदपत्रांच्या पूर्ततेचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ः श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी (मल्टी-स्टेट) या संस्थेमार्फत पेन्शनर्स सभासदांसाठी जीवन प्रमाणपत्र (हयातीचा दाखला) ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचा जास्तीत जास्त पेन्शनर्स सभासदांनी लाभ घेऊन आपल्या पेन्शन कामी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन ‘रवळनाथ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. के. मायदेव यांनी केले.
श्री. मायदेव म्हणाले, ‘‘केवळ हौसिंग फायनान्स करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘रवळनाथन’ने बँकिंग क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्राहकांना तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न संस्थेच्या स्थापनेपासूनच राहिला आहे. सध्या आजरा, गडहिंग्लज, चंदगड, नेसरी, कोल्हापूर, जयसिंगपूर, बेळगांव, निपाणी, कुडाळ, सांगली, पुणे, कराड, सांगोला, चिक्कोडी व धारवाड अशा एकूण १६ शाखा सुरू आहेत. संस्थेच्या सर्व शाखांमध्ये गृहकर्जाबरोबरच सोनेतारण, गृहोपयोगी उपकरणे खरेदी व शैक्षणिक कर्जही दिले जाते. वयोवृद्ध आणि गंभीर आजारी सभासद, ग्राहकांना घरपोच सेवा दिली जाते. शासकीय, निमशासकीय क्षेत्रातील अनेक पेन्शनर्स संस्थेचे सभासद आहेत.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘पेन्शनर्स व्यक्तींना दरवर्षी नोव्हेंबरमध्ये हयातीचा दाखला द्यावा लागतो, परंतु त्यासाठी तासनतास बॅंकांमध्ये रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. वयोमान तसेच शारीरिक तक्रारीमुळे अनेकांना धावपळ करणे शक्य होत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येत नाही. अजूनही काही पेन्शनर्सकडून दाखल्यांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे त्यांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने पेन्शनर्स सभासदांना रवळनाथ संस्थेमार्फत जीवन प्रमाणपत्र (हयातीचा दाखला) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी पेन्शनर्स सभासदांनी आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com