नोंदणी पध्दतीने लग्न करणाऱ्यास बक्षिस
swt413.jpg
08420
निर्सगरम्य चौकुळ गाव (संग्रहीत छायाचित्र)
swt414.jpg
08421
गुलाबराव गावडे
नोंदणी पध्दतीने लग्न करणाऱ्यास बक्षिस
चौकुळमध्ये ठरावः अनावश्यक खर्च टाळण्यासाठीची जागृती
सकाळ वृत्तसेवा
आंबोली, ता. ४ः लग्न समारंभातील अवाढव्य आणि अनावश्यक खर्च टाळला जावा, यासाठी चौकुळ ग्रामपंचायतीने प्रोत्साहन उपक्रम जाहीर केला आहे. पालकांच्या संमत्तीने सामुदायिक सोहळ्यात किंवा नोंदणी पध्दतीने लग्न करणाऱ्या जोडप्याला दहा हजाराचे बक्षिस देण्याचा ठराव ग्रामसभेने घेतला आहे. या उपक्रमाने इतर ग्रामपंचायतींनीही अनुकरण करावे, अशी अपेक्षा तेथील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
चौकुळ हे सह्याद्रीच्या रांगांमधील देखणे गाव. येथे अनेक पिढ्या विविध आदर्श प्रथा पाळल्या जात आहेत. तंटामुक्त असलेले हे गाव आपल्या सामाजिक उपक्रम आणि गावकऱ्यांच्या एकोप्यासाठी विशेष ओळखले जाते. अलिकडेच या गावाने ग्राम पर्यटनामध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता या नव्या उपक्रमाने चौकुळने लक्ष वेधून घेतले आहे. येथील सरपंच गुलाबराव गावडे यांच्या पुढाकारातून लग्न समारंभातील अनाठाई खर्च वाचवला जावा, या विचाराची जागृती होण्यासाठी बक्षिस योजनेचा ठराव ग्रामसभेने घेतला आहे.
ही संकल्पना सांगताना श्री. गावडे म्हणाले, ‘‘प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात लग्न म्हणजे सर्वांत मोठा आनंदाचा क्षण असतो; पण यात होणारा बडेजाव व त्यासाठी होणारा अनावश्यक खर्च यामुळे पालकाची ओढाताण होते. एक लग्न सोहळा झाला की अनेक पालकांना कर्जाचा बोजा डोक्यावर घ्यावा लागतो. एक दोन दिवसाच्या या सोहळ्यातील खर्चाचे कर्ज फेडताना बरीच वर्षे जातात. सामुदायिक लग्न सोहळ्यात विवाह केल्यास किंवा नोंदणी पध्दतीने लग्न केल्यास हा खर्च टाळला जाऊ शकतो. याच विचाराच्या जागृतीसाठी आमच्या ग्रामसभेने हा ठराव घेतला आहे. पालकांच्या संमतीने सामुदायिक अथवा नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्या जोडप्याला दहा हजाराचे बक्षिस दिले जाणार आहे. यासाठीच्या तरतुदीला चौकुळच्या ग्रामसभेत एकमताने संमती देण्यात आली.’’
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी अमीत राऊळ तंटामुक्त समीती अध्यक्ष बाळाभाई गावडे, सोसायटी चेअरमन पांडुरंग गावडे , उपसरपंच आरती जाधव, माजी सरपंच विजय गावडे , बाबु शेटवे , ग्रामपंचायत सदस्य संजना गावडे, मेघा मेस्त्री, वैष्णवी गावडे, अभिजीत मेस्त्री तसेच ग्रामस्थ बापु गावडे, अर्जुन गावडे, रुपेश गावडे , अमोल गावडे, अविल गावडे उपस्थित होते.
कोट
चौकुळमध्ये फार पूर्वीपासून सगळ्यांनाच दिशादर्शक ठरतील, अशा अनेक प्रथा पाळल्या जात आहेत. यातूनच चौकुळने आपली आदर्श परंपरा टिकऊन ठेवली आहे. आता लग्नाबाबत घेतलेला हा बक्षिस योजनेचा ठराव अनेकांसाठी आदर्शवत ठरणार आहे. याची अंमलबजावणी येत्या आर्थिक वर्षांत होणार असून असाच निर्णय इतर ग्रामपंचायतींनी सुध्दा घ्यावा अशी अपेक्षा आहे.
- गुलाबराव गावडे, सरपंच, चौकुळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

