मंडणगड-सोळाशे शेतकरी नुकसानीच्या प्रतीक्षेत
-Rat४p१०.jpg
२५O०८३८६
मंडणगड : अतिवृष्टीत भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
---
मंडणगडातील शेतकरी नुकसानीच्या प्रतीक्षेत
तालुक्यातील ३३४.५६ हेक्टरवरील पिकांना फटका ; २९ लाख ६९ हजारांची गरज
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ४ ः मॉन्सूनचा मुक्काम वाढल्याने ऑक्टोबर महिन्यात मंडणगड तालुक्यात खरीप हंगामातील भात, नाचणी, वरी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तालुक्यात एकूण ३३४.५६ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन १६०० शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी व महसूल खात्याकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यात स्पष्ट झाले आहे. यंत्रणेने निश्चित केलेल्या २९ लाख ६९ हजार ६५ रुपयांच्या नुकसानभरपाई निधी अद्याप प्रतीक्षेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मॉन्सूनचा मुक्काम वाढला. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात मंडणगड तालुक्यातील खरीप हंगामाला त्याचा फटका बसला. या हंगामातील भात, नाचणी, वरी आदींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकरीवर्ग हलालदील झाला आहे. सध्या तो नुकसान भरपाई कधी मिळेल याच्या प्रतीक्षेत आहे. यापूर्वी, जून-सप्टेंबर २०२५ दरम्यान तालुक्यात १४४ शेतकऱ्यांच्या ४९.२२ हेक्टर क्षेत्रातील नुकसानीवर ३ लाख ७५ हजार रुपये वितरित करण्यात आले होते. त्याच कालावधीत घरे व गोठे नुकसान झालेल्या २२ प्रकरणांना २ लाख ५० हजार रुपये, तर पशुधन नुकसानीवर ६९ हजार ५०० रुपये मदत देण्यात आली असल्याची माहिती तहसील कार्यालयाने दिली. तथापि, तालुक्यातील जमीन धारणा क्षमता अत्यल्प असल्याने नुकसानभरपाईच्या वाटपात विसंगती निर्माण झाली आहे. एक गुंठा नुकसान झालेला शेतकरी आणि अकरा गुंठे नुकसान झालेला शेतकरी दोघांनाही समान निधी मिळत असल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण आहे. शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळावी, निधीचे वाटप पारदर्शकपणे आणि नुकसानाच्या प्रमाणानुसार व्हावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांतून होत आहे. याकडे भागातील लोकप्रतिनिधींनीही लक्ष देऊन शासनाकडे त्याचा पाठपुरावा करावा आणि वेळीच भरपाई मिळून द्यावी अशीही मागणी होत आहे.
---
कोट
ऑक्टोबरमध्ये पावसात झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी पूर्णपणे नाउमेद झाला आहे. हाताशी आलेले पीक वाया गेल्याने यावर्षीची सर्व मेहनत पाण्यात गेली आहे. शासनाने या नुकसानीचे भरपाई अनुदान लवकरच शेतकऱ्यांना द्यायला हवे.
- रघुनाथ पोस्टुरे, सामाजिक कार्यकर्ते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

