कालीदास स्मृती व्याख्यानमालेत

कालीदास स्मृती व्याख्यानमालेत

Published on

-rat४p१५.jpg-
२५O०८४२७
डॉ. सुचेता परांजपे
-----
‘गोगटे’मध्ये सोमवारपासून
कालिदास स्मृती व्याख्यानमाला
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात ६९व्या कालिदास स्मृती समारोह व्याख्यानमालेचे आयोजन येत्या ८ व ९ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात केले आहे. ही व्याख्यानमाला पुणे येथील संस्कृत विदुषी डॉ. सुचेता परांजपे गुंफणार आहेत.
व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ८ डिसेंबरला सकाळी १०.३० वा. डॉ. पराजंपे या महाभारत : समज आणि गैरसमज या विषयावर आणि दुसरे पुष्प ९ डिसेंबरला महाभारतातील निवडक स्त्री- व्यक्तिरेखा या विषयावर गुंफणार आहेत. महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये कार्यक्रम होणार आहे. डॉ. परांजपे यांनी शालांत परीक्षेत दोन सुवर्णपदके, नऊ पारितोषिकांसह गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करूनही संस्कृत अध्ययन अध्यापन कार्याचा ध्यास असल्याने कला शाखेत प्रवेश घेतला. पुणे विद्यापीठातून त्यांनी बीए, एमए संस्कृतमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. विद्यार्थी, पालक, साहित्यप्रेमींनी व्याख्यानमालेस उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com