कोकण
देवरुखात मतपेट्यांना बंदूकधारी पोलिसांचा पहारा
देवरूखात मतपेट्यांना
बंदूकधारी पोलिस पहारा
साडवली, ता. ५ ः संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर मतदान यंत्रे नगरपंचायत कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर अत्यंत कडोकोट सुरक्षाव्यवस्थेत ठेवण्यात आली आहेत. मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या स्ट्राँगरूमच्या सुरक्षिततेसाठी अभेद्य सुरक्षाकवच असून, २४ तास बंदूकधारी पोलिसांचा जागता पहारा ठेवण्यात आला आहे.
तालुक्यातील देवरूख नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी व नगरसेवकपदासाठी १७ प्रभागांकरिता शांततेत मतदान झाले. त्याचा निकाल २१ ला लागणार आहे. मतदान यंत्रे नगरपंचायतीच्या दुसऱ्या मजल्यावर सभागृहात ठेवण्यात आली आहेत. या मतदान यंत्रांसाठी स्ट्राँगरूम बनवण्यात आले आहे.

