चिपळूणच्या उपनगराला कचऱ्याचा विळखा
ग्राऊंड रिपोर्ट---लोगो
-rat५p९.jpg-
२५O०८६०३
चिपळूण ः फलक लावलेल्या ठिकाणीच नागरिक कचरा टाकतात.
-rat५p१०.jpg-
२५O०८५९९
नदीकिनारी टाकलेला कचरा.
-rat५p१२.jpg-
२५O०८६०१
शहरातील बायपास मार्गावर फिरायला जाणारे नागरिक प्लास्टिकच्या पिशवीतून कचरा टाकतात.
-----
चिपळूणमधील उपनगरांना कचऱ्याचा विळखा
कुंड्या हटल्या, घंटागाडी आली; नागरिकांची मानसिकता बदलण्याचे पालिकेपुढे आव्हान
चिपळूण, ता. ५ : शहर कचराकुंडीमुक्त करताना वाढत्या शहराचा कचरा कसा उचलायचा? यावर तोडगा म्हणून कचरा घंटागाडी प्रकल्प राबवला गेला. चिपळूण पालिकेचा कचरा घंटागाडी प्रकल्प राज्यात आदर्श ठरला. तो पुढे राज्यभर सुरू आहे; परंतु चिपळूण शहर कचराकुंडीमुक्त झाले; मात्र कचऱ्याची समस्या अजून कायम आहे. कारण, कुंड्या हटल्या; परंतु रस्त्यावर कचरा टाकण्याची काहींची मानसिकता अजूनही तशीच आहे. म्हणूनच राज्यात स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या दहामध्ये चिपळूण शहराचा क्रमांक येत नाही. प्रशासनाने कितीही प्रयत्न केले तरी रस्त्यावर कचरा टाकण्याच्या मानसिकतेत बदल झालेला नाही. मुख्य बाजारपेठेतला कचरा उचलला जातो; मात्र उपनगरातील रस्त्यावर कचऱ्याची समस्या कायम आहे.
---मुझफ्फर खान, चिपळूण
---
चिपळूण नगरपालिकेला स्वच्छता सर्वेक्षणाअंतर्गत २०२४ मध्ये कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळाला आहे तर महाराष्ट्र राज्यात १४वा क्रमांक आहे. या व्यतिरिक्त, ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत कोकण विभागातून प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल शासनाकडून ७५ लाखांचे पारितोषिक मिळाले आहे. प्रामुख्याने कचऱ्याचे संकलन आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पालिकेने कायमस्वरूपी केलेली व्यवस्था हे मानांकन मिळवण्यासाठी महत्त्वाची ठरली. स्वच्छता ही सेवा नाही तर प्रत्येकाची सवय बनवण्यासाठी पालिकेने कमालीचे प्रयत्न केले आहेत; मात्र नागरिकांमध्ये स्थायी स्वरूपाचे बदल घडत नाहीत. पालिकेने कितीही सुविधा उपलब्ध करून दिल्या तरी नागरिक एकतर गटारात कचरा टाकतात किंवा रस्त्याच्या कडेला टाकून देतात. त्यामुळे नागरिकांची मानसिकता बदलण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे.
---
*अशी होते कचऱ्याची विल्हेवाट
शहरातून ओला व सुका या प्रमाणात कचरा संकलन केले जाते. पूर्वी घंटागाडी कर्मचारी विलगीकरण करायचे; परंतु आता घरातूनच कचरा वर्गीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने धामणवणे येथे कचरा प्रकल्प उभारला आहे. तेथे कचऱ्यावर प्रक्रिया करून खत तयार केले जाते. ते खत शेतकऱ्यांना कमी किमतीत विक्री होते.
*ई-कचऱ्याचा प्रश्न गंभीर
शहरात ई-कचरा वाढत आहे. बंद पडलेले टीव्ही, संगणक, इलेक्ट्रॉनिक खेळणी, प्लास्टिक, फ्रिज, वॉशिंग मशिन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचा ई-कचऱ्यात समावेश होतो. ई-कचऱ्यामधील वस्तूंमध्ये विविध प्रकारचे विषारी गॅस असल्याने त्यातून प्रदूषण वाढते. पालिकेकडे ई-कचरा संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही.
*२०१८ पासून प्लॅस्टिकवर बंदी
पर्यावरण मंत्रालयाने महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) अधिसूचना-२०१८ नुसार पालिकेने १ एप्रिल २०१८ पासून शहरात प्लास्टिक बंदी लागू केली आहे. प्लास्टिक वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने पथकांची नियुक्ती केली आहे. शहरातील शंभरहून अधिक विक्रेत्यांवर कारवाई करून सुमारे दहा लाखांचा दंड लावण्यात आला आहे
*प्लास्टिक बाटल्या संकलनासाठी पिंजरे
प्लास्टिकच्या बाटल्या गटारात आणि नाल्यात टाकल्या जायच्या त्यामुळे पावसाळ्यात नाले तुंबून पाणी रस्त्यावर द्यायचे. प्रांताधिकारी आकाश लिगाडे आणि सामाजिक कार्यकर्ते भाऊ काटदरे यांनी लोकसहभागातून शहरात प्लास्टिक बाटल्या संकलनासाठी पिंजरे उभे केले आहेत. त्यामुळे नाल्यात जाणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांची संख्या कमी झाली आहे.
*शहरात कचरा आढळणारी ठिकाणे
१)बायपासच्या रस्त्यावर फिरायला जाणारे नागरिक प्लास्टिकच्या पिशवीतून कचरा रस्त्याच्या कडेला फेकून देतात.
२)उक्ताडमधून परिसरातील रस्त्यावर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये कचरा आढळून येतो. तेथे मोठी दुर्गंधी असते.
३)भाजीमंडईच्या मागील बाजूला शिवनदीत भाजीविक्रेते कचरा टाकतात. त्यांचा निम्मा कचरा हा रस्त्यावर पडलेला आढळतो.
३)खाटीक आळीतून वाशिष्टी नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक चिकनविक्रेते आणि या परिसरातील ग्रामस्थ कचरा टाकतात.
४)नाईक कंपनी परिसर आणि गुहागरनाका परिसरातही रस्त्याच्या कडेला कचऱ्याची मोठी समस्या आहे.
५) मुख्य बाजारपेठेतील काही ठिकाणी तसेच तलावांच्या ठिकाणी कचरा केलेला आढळतो.
शहरात पालिकेने कुठेही कचराकुंडी ठेवलेली नाही. काही दुकानासमोर कुंड्या ठेवल्या आहेत. त्यावर चिपळूण पालिकेचे नाव आहे.
*उपनगरातही कचऱ्याचे ढीग
चिपळूण शहरातील उपनगरात अनेक ठिकाणी ढिगाने कचरा साचलेला असतो. पालिका जेसीबीच्या मदतीने या कचऱ्याची विल्हेवाट लावते. शहरातील अशा काही ठिकाणी सामाजिक संस्थांनी पुणेरी पद्धतीचे फलक लावले आहेत. कचरा टाकणाऱ्याला लज्जा निर्माण होईल, असा मजकूर त्या फलकावर लिहिण्यात आला आहे.
*अशी आहे दंडात्मक कारवाई
पालापाचोळा, प्लास्टिक, कचरा जाळणे - ५ हजार
सर्व प्रकारचा कचरा जाळणे - २५ हजार
सार्वजनिक कचरा टाकणे -१० हजार
उघड्यावर मैला टाकणे -५ हजार
रस्त्यांवर घाण करणे - १८० रुपये
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे -१५० रुपये
उघड्यावर लघुशंका करणे- २०० रुपये
उघड्यावर शौच करणे - ५०० रुपये
कचरा विलगीकरण न करणे -३०० ते ५०० रुपये
मोठ्या प्रमाणात कचरा करणे - १५ हजार रुपये
धूम्रपान, तंबाखू, पानमसाला सेवन, थुंकणे - १ ते ५ हजार रुपये
उघड्यावर मांसविक्री - ५ ते २५ हजार
बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणे - ५ ते २५ हजार
आरएमसी साहित्य रस्त्यावर पडल्यास - १० हजार
अवजड वाहनाद्वारे होणारे नुकसान - १० ते २५ हजार
बांधकाम पाणी रस्त्यावर सोडणे - ५ ते २५ हजार
*कचरा विलगीकरण न केल्यास दंड
नागरिक* ३०० रुपये
व्यापारी, शासकीय आस्थापना* ५०० रुपये
हॉटेल, बार* ५ हजार- रुपये
दृष्टिक्षेपात...
शहरात घंटागाड्यांची संख्या* १४
रोज संकलित होणारा एकूण घनकचरा* १५ टन
ओला कचरा* ४ टन
घंटागाडीवरील कामगार* ५०
रस्त्यावरील कचरा उचलण्यासाठी* २६
कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी* २०
--------
कोट
प्लास्टिकची बेकायदा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर एप्रिल २०२५ पासून आतापर्यंत १४ विक्रेत्यांना २५ हजाराचे दंड लावण्यात आले आहे. बाहेरून आलेले पर्यटक रस्त्यावर लघुशंका करताना आढळले त्यांनाही दंड लावण्यात आला आहे. स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही कोणालाही सवलत देत नाही. कचरामुक्त शहर करण्यासाठी आरोग्यविभाग सक्रिय आहे. हॉटेलमधील ओला कचरा आणि चिकन व मटणविक्रेत्यांचा कचरा गोळा करण्यासाठी आम्ही स्वतंत्र घंटागाडीची व्यवस्था केली आहे. गार्डनचा कचरा उचलण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे.
- सुजित जाधव, आरोग्य निरीक्षक, चिपळूण पालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

