श्रेयस लालेची निवड

श्रेयस लालेची निवड

Published on

-rat५p४.jpg-
२५O०८५७५
श्रेयस लाले
------
राज्यस्तरीय कबड्डीसाठी
श्रेयस लालेची निवड
दापोली ः कोल्हापूर विभागीय शालेय कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत टाळसुरे येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या श्रेयस लाले याची १७ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विभागीय स्पर्धेतील चमकदार कामगिरीमुळे श्रेयसची निवड झाली आहे. श्रेयसने यापूर्वीही महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनमार्फत आयोजित स्पर्धांमध्ये रत्नागिरीचे प्रतिनिधित्व करत आपली क्षमता सिद्ध केली आहे. तालुका, जिल्हा तसेच विभागीय स्तरावर त्याने सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय खेळ करत निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. बऱ्याच काळानंतर रत्नागिरी जिल्ह्याचा १७ वर्षांखालील मुलांचा कबड्डी संघ विभागीय स्तरावर पोहोचला असून, या यशात श्रेयसचा मोठा वाटा आहे. संगमनेर येथे राज्यस्तरीय निवड चाचणी होणार आहे.

पित्रे महाविद्यालयात
कथाकथन स्पर्धा
साडवली ः देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सदस्य (कै.) द. ज. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ २४वी कोकण विभागीय कथाकथन स्पर्धा ९ डिसेंबरला सकाळी १० वा. पित्रे महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. स्पर्धा रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठीच मर्यादित आहे. स्पर्धेसाठी ऐतिहासिक, विज्ञान व विनोदी कथा स्पर्धकांना सादर करता येणार आहेत. कथाकथन मराठीतच करावयाचे असून, प्रत्येक स्पर्धकाला किमान ७ मिनिटे व कमाल १० मिनिटे वेळ दिला जाणार आहे. स्पर्धेसाठी कनिष्ठ महाविद्यालयातील कितीही विद्यार्थ्यांना या स्पर्धेत प्रत्यक्ष सहभागी होता येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे स्पर्धेत सहभागी होत असल्याचे पत्र घेऊन येणे गरजेचे आहे. विजेत्यांना रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.


निकम विद्यालयात
शैक्षणिक मार्गदर्शन
सावर्डे ः सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालयात जिल्हा परिषद शिक्षण विभाग व सह्याद्री शिक्षणसंस्थेतर्फे ‘मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा’ टप्पा क्रमांक तीन व विविध शैक्षणिक विषयांवरील मार्गदर्शन शिबिर झाले. या वेळी शिक्षणाधिकारी किरण लोहार, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) दीपक मेंगाने, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रदीप पाटील, विस्तार अधिकारी नरेंद्र गावंड, विस्तार अधिकारी संदेश कडव आदी उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन, अध्ययन निष्पत्ती, सीसीटीव्ही कॅमेरे, प्लास्टिकमुक्ती, नशामुक्ती उपक्रम, विद्यार्थी सुरक्षा अशा महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com