राज्य नाट्य स्पर्धा
राज्य नाट्य स्पर्धा... लोगो
rat६p२.jpg-
२५O०८८४६
रत्नागिरी- राज्य नाट्यस्पर्धेत कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघ या संस्थेने केलेल्या ‘जन्मवारी’ या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ- सकाळ छायाचित्रसेवा)
-----
‘जन्मवारी’ने उलगडला गणिकांचा जीवन प्रवास
कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघ ; वारकरी संप्रदायाची मेख
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ः मंगळवेढ्यात जन्मलेली १५व्या शतकातील वारकरी संप्रदायातील संत-कवयित्री कान्होपात्रा आणि सद्यःस्थितीतील गणिका व आश्रमात आयुष्य घालवणारी मुलगी यांचा जीवनप्रवास ‘जन्मवारी’ या संहितेतून उलगडला आहे. वारकरी संप्रदाय आणि सद्यःस्थितीचा योग्य मेळ दिग्दर्शक प्रसाद धोपट यांनी या नाटकातून सहजसुंदरतेने मांडला. राज्य नाट्यस्पर्धेत कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघ या संस्थेने हा प्रयोग स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात केला. नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, रंगभूषा आणि कलाकारांच्या उत्तम अभिनयात वारकरी संप्रदायाची परंपरा पाहायला मिळाली तसेच गणिकांच्या जीवनप्रवासाचे दर्शन झाले.
----
गणिका-मंजिरी व आश्रमात काम करणारी मुलगी वृंदा या दोघी प्लॅटफॉर्मवर ट्रेन चुकल्यामुळे प्रतीक्षा करत असतात. तेवढ्यात एक चोरटा वृंदाची पिशवी चोरून नेत असतो. मंजिरी त्याला अडवते आणि या दोघी पहाटेपर्यंत प्लॅटफॉर्मवर रात्र काढतात. या दोघींचा व शामा नायकिणीची मुलगी संत कान्होपात्रा यांचा जीवनप्रवास जन्ममृत्यूचे चक्र ‘जन्मवारी’ या संहितेतून लेखिका हर्षदा बोरकर यांनी मांडली आहे. या नाटकातील वृंदा ही मुस्लिम मुलगी असून, एका आश्रमात झाडू मारण्याचे तसेच शौचालय धुण्याचे काम करत असते. मंजिरी ही गणिका असते. परिस्थितीने तिला हा व्यवसाय करावा लागतो. दोघींच्या रात्रभर एकमेकांच्या संवादातून त्यांच्या मनाची उकल होते. चांगल्या मैत्रिणी होतात.
जन्मवारी या नाटकात १५व्या शतकातील संत कान्होपात्रा वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाची संत, कवयित्री होत्या. त्यांनी विठ्ठलभक्तीपर अंभग रचले. मंगळवेढा येथे जन्मलेल्या कान्होपात्रा श्रीहरीच्या नामस्मरणात वेळ घालवत असते. त्याला विठा साथ देते. शामा नायकिणीला कान्होपात्राने नायकिणीचाच व्यवसाय करावं, असे वाटत असते; पण कान्होपात्रा ही लहानपणापासून श्रीहरीची भक्ती करत असल्यामुळे तिला साज, श्रृंगार यामध्ये रस नसतो. श्रीहरीचे नामच तिच्यासाठी सर्व काही असते. एक दिवशी वाड्या जवळून पंढरपुरात जाणाऱ्या वारीत विठा आणि कान्होपात्रा सामील होतात. पंढरपुरात गेल्यावर पुजारी कान्होपात्राला मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश देत नाही; पण श्रीहरीची भक्त कान्होपात्रा मंदिर परिसरातील कचरा साफ करणे, फुलं वेचणे अशी कामे करताना श्रीहरीच्या भक्तीत अभंग रचते. त्यामुळे पुजाऱ्यांसह सर्व हरिभक्त कान्होपात्राच्या अभंगाचे गुणगान करतात.
एके दिवशी शामा नायकीण बिदरच्या बादशहाकडे कान्होपात्राचा सौदा पक्का करतात. सरदार तिला न्यायला मंदिरात येतात. इकडे पहाटेचे पाच वाजल्याने प्लॅटफॉर्मवर गाडी येणार असते. वृंदाच्या बोलण्याने मंजिरीच्या मनाचे परिवर्तन होते. गणिकेचा व्यवसाय सोडणार असते. कान्होपात्राला सरदार ओढत घेऊन जात असतात; मात्र कान्होपात्रा श्रीहरीचे एकदा दर्शन घेऊ दे, असे सांगते. मंदिराच्या पायरीपर्यंत जाते तिथेच ती प्राण समर्पण करते. जन्मवारी या नाटकातून वृंदा, मंजिरी आणि संत कान्होपात्रा यांचा जीवनप्रवास, नेपथ्य, रंगभूषा आणि कलाकारांच्या अभिनयातून उजळून निघाला.
-------
सूत्रधार आणि सहाय्य
पार्श्वसंगीत ः मंदार देशपांडे, संगीत संयोजन ः रोहित कांबळे, प्रकाशयोजना ः श्याम चव्हाण, प्रकाशयोजना सहाय्यः साई शिर्सेकर. नेपथ्य- प्रसाद धोपट, रंगमंच व्यवस्था- राहूल कासले, मनिष वरवडेकर, दीपक मालप, संदीप मालप.
-----
पात्र परिचय
मंजिरी- श्रद्धा नालिंदे, कान्होपात्रा-अमिषा देसाई, वृंदा - श्वेताली अडसूड, विठा ः सुप्रिया पवार, श्यामा- भाग्यश्री महाजन, सरदार- विष्णू घाणेकर, दरबारी पहिला- अजय बागवे, दरबारी दुसरा-दत्ताराम माईंगळे, हवालदार- संजय चव्हाण, पुजारी- प्रसाद धोपट, अण्णा- प्रतीक राजेशिर्के, शिलेदार पहिला- संदीप शेंगदाणे, शिलेदार दुसरा- संकेत वाणी, वारकरी महिला- वैष्णवी मांजरेकर, वारकरी महिला दुसरी – सुकन्या खापरे.
----------
आजचे नाटक
रविवारी (ता. ७) नाटक नाही. सोमवारी (ता. ८) नाटक- नमान, सादरकर्ते- सुमती थिएटर्स, रत्नागिरी. स्थळ- स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी. वेळ- सायंकाळी ५ वा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

