स्वामी स्वरूपानंदांचा जन्मोत्सव ११ ते १६ डिसेंबरदरम्यान
-rat६p१३.jpg-
२५O०८८४५
स्वामी स्वरूपानंद
----
‘स्वामी स्वरूपानंद’ यांचा सहा दिवस जन्मोत्सव
११ ते १६ डिसेंबर अखेर आयोजन ; आज रत्नागिरीत बालदिंडी
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ६ : श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांचा १२३वा जन्मोत्सव सोहळा ११ ते १६ डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. १६ डिसेंबर रोजी तिथीनुसार स्वामीजींचा १२३वा जन्मोत्सव आहे. उत्सवानिमित्त रविवारी (ता. ७) सकाळी ८. वा. लक्ष्मीचौक ते अध्यात्म मंदिर या मार्गावर बालदिंडी काढण्यात येणार आहे.
१४ डिसेंबरला पहाटे ४.३० ते ९.३० या वेळेत रत्नागिरी ते पावस पायी दिंडीचे आयोजन केले आहे. याच दिवशी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे रत्नागिरी ते पावस समाधी मंदिरापर्यंत सायकलवारीचेही आयोजन केले आहे. ११ ते १५ डिसेंबर या कालावधीत दररोज सकाळी ७ ते १२ स्वामी स्वरूपानंद यांच्या ग्रंथांचे पठण : व्यासपीठ मनोज जोशी करतील. रात्री ८.३० श्री हरिपाठ होईल. ११ डिसेंबरला दुपारी ४.३० वा. : विश्व हिंदू परिषदेचे (पुणे विभाग) सरचिटणीस दादा वेदक यांचा सत्संग होणार आहे. १२ ला दुपारी ३ वा. संजीवनी गाथा अभंग गायन स्पर्धा अंतिम फेरी होणार आहे. १३ ला सकाळी १०.३० ते दुपारी २ (कै.) र. वा. तथा भाऊराव देसाई स्मृतीप्रीत्यर्थ जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व व पाठांतर स्पर्धा आणि दुपारी ४ वा. चैत्राली अभ्यंकर (पुणे) अभंग गायन करणार आहेत. १४ ला दुपारी ४ वा. रमण शंकर (मुंबई) यांचे अभंग गायन होईल. १६ ला मुख्य दिवशी पहाटे ३ वा. काकड आरती, ४ वा. समृद्धपूजा, ६ वा. आरती, गावातील प्रमुख देवस्थानी पूजा व मंत्राभिषेक, सकाळी ९ वा. अनंतनिवास ते श्रीस्वामी समाधी मंदिरापर्यंत दिंडी सोहळा, सकाळी १० च्या आरतीनंतर महाप्रसाद होईल. दुपारी ११ ते १२.१५ वा. हास्ययोगातून आनंद साधनावर मकरंद टिल्लू यांचे व्याख्यान, १२.३० वा. अमेया पळणीटकर (पुणे) यांचे कथ्थक नृत्य सादर होईल. १.३० वा. गीत स्वरूपानंदायन कार्यक्रम कल्पेश साखळकर (प्रार्थना केंद्र, मुंबई) सादर करतील. २.४५ ला उत्तरेश्वर भजनी मंडळाचे (कोल्हापूर) सुश्राव्य भजन सादर होईल. ३.४५ ला (कै.) र. वा. तथा भाऊराव देसाई वक्तृत्व स्पर्धा सादरीकरण व स्वामी स्वरूपानंद पारितोषिक वितरण (कै. मिनाक्षी वसंत देसाई स्मरणार्थ) केले जाईल. ४.४५ ते ५.१५ साईगणेश मंडळ (सांगरुळ) लेझीमपथक, सायं. ५.१५ वा. स्वामी जन्माचे कीर्तन अवधुतबुवा टाकळीकर (जन्मवेळ सायं. ७.३९) व रात्री ९ ऋषिकेश रानडे व प्राजक्ता रानडे यांचा संगीत रजनी कार्यक्रम होईल.
चौकट १
वक्तृत्व स्पर्धा, व्याख्याने
१५ डिसेंबर रोजी स्वामी स्वरूपानंद आंतरराज्यस्तरीय उच्च व कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा सकाळी १० ते दुपारी २.३० या वेळेत गोगटे महाविद्यालयात होईल. ३ वा. पारितोषिक वितरण माजी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांच्या हस्ते होईल. याच दिवशी स्वामीजींचा तारखेप्रमाणे जन्मोत्सव असून, सायं. ५:३० वा. श्री क्षेत्र पावस षण्मासिकाचे प्रकाशन व प्रवीण मुळ्ये यांचे कीर्तन अध्यात्म मंदिरात होणार आहे. पावस येथे समाधी मंदिरात १५ला दुपारी ४ वा. वारकरी कीर्तन नरहरी सांगळे (आळंदी) सादर करतील. रात्री ८.३० वा. सुमेधा चिथडे राष्ट्राय स्वाहा इदं न मम् यावर व्याख्यान देतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

