आजपासून किर्तन महोत्सव

आजपासून किर्तन महोत्सव

Published on

आंबडसमध्ये आजपासून कीर्तन महोत्सव
खेड ः आंबडस येथील श्री गुरूमाऊली सामाजिक सेवा संस्थेंतर्गत वारकरी शिक्षण संस्थेतर्फे ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत जनकल्याण कीर्तन महोत्सव होणार आहे. ६ ला आंबडस येथील दिनेश करंजकर यांचे प्रवचन, मुंबईतील अर्जुन सुंभे यांचे कीर्तन व आंबडस येथील महिला भजन मंडळाचा जागर, ७ ला चिरणी येथील जनार्दन आंब्रे यांचे प्रवचन, मुंबई येथील ज्ञानेश्वर सांगले यांचे कीर्तन व शेल्डी येथील स्वर विठाई भजन मंडळाचा जागर, सकाळी ११ वा. आरोग्यविषयक मार्गदर्शन, ८ ला सकाळी १० वा. मुंबई येथील तुकाराम निकम यांचे काल्याचे कीर्तन होईल.

तायक्वांदो बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत
संगमेश्वरच्या तायक्वांदोपटूंचे यश
साडवली ः संगमेश्वर तालुका तायक्वांदो अॅकॅडमी व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे देवरूख येथे बेल्ट ग्रेडेशन परीक्षा झाली. या वेळी नगरपंचायत देवरुख तायक्वांदो क्लब उपाध्यक्षा ॲड. पूनम चव्हाण, उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, महेश भागवत, पिहू कांगणे आदी उपस्थित होते. यामध्ये यलो- निकुंज घडशी, प्रचिती कांगणे, प्रभात रहाटे, शौनक राजवाडे, मिहिका लाड, रीतीशा कांगणे, ईश्वरी कांगणे, उर्वी किल्लेदार, शुभ्रा माळी, अवनी भिंगार्डे, श्रावणी कोळवणकर, अनुराग यादव, गंधार रेवडेकर, हिरन्मयी भागवत, हेरंब भागवत. ग्रीन- जीवित देशपांडे, कियान वी, रियांश वी, मयंक खानापूरकर, पूर्वा रहाटे, ओमराजे महाडिक, आदित्य आंबवकर. ग्रीन-वन- सई संसारे, तनिष्का कांगणे. ब्ल्यु- स्वानंदी कांगणे, शर्विल कांगणे, आरोही तांबे, यश तांबे, अन्वय कोळवणकर, शुभ्रा सुर्वे. ब्ल्यू-वन- अबीर शेट्ये, ऋतिक कांगणे, ईशान भागवत, रेड- नक्षत्रा शिंदे, आदित्य चिपळूणकर, प्रथमेश कारेकर, वेद पटेल. रेड-वन- अजिंक्य शिंदे.

पूर्णगडमधील निवासी शिबिरात
सायबर संस्कारवर मार्गदर्शन
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे येथील लोकनेते शामराव पेजे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर पूर्णगड ग्रुप ग्रामपंचायत येथे सुरू आहे. यामध्ये सायबर संस्कार या विषयावर आधारित अक्षय फाटक यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती देऊन विद्यार्थ्यांना संबोधित केले. विद्यार्थ्यांनी स्वतःला शिक्षित करावे की सुशिक्षित करावेय़ यासारखे प्रश्न मांडून विद्यार्थ्यांना व्याख्यान दिले. या डिजिटल युगात स्वतःला अपडेट करता करता स्वतःला आपण सक्षम आणि सुरक्षित करणे आवश्यक आहे असे काळजीवाहू विचार मार्गदर्शनातून व्यक्त केले. या वेळी सुहासिनी धानबा, सोहम बापट, प्रकाश पवार, सारिका पावसकर, कल्पना मेस्त्री, अमित पवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com