रत्नागिरीत लोटला भीमसागर
-rat६p१९.jpg-
२५O०८८९२
रत्नागिरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पोलिसदलातर्फे पुष्पहार अर्पण करताना पोलिस अधीक्षक नितीन बगाटे.
---------
रत्नागिरीत लोटला ‘भीमसागर’
महापरिनिर्वाण दिन ; महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रत्नागिरीत भीमसागर लोटला. मध्यरात्रीपासून येथे हजारो अनुयायांनी डॉ. आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले. जय भीम म्हणत अनुयायांनी पुष्पहार अर्पण करून आणि मेणबत्ती प्रज्वलित करून पंचशील प्रार्थना म्हटली.
समता सैनिकदलाच्या तुकडीने संचलन करत डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला शिस्तीची आणि समतेची सलामी दिली. समाजातील अनुशासन, समता आणि धम्माच्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करणारी ही उपस्थिती कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली. साधारण १० वाजल्यानंतर डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी रांग लागण्यास सुरुवात झाली. समता सैनिकदलाच्या नेतृत्त्वाखालील शिस्तबद्ध रांगांमुळे दर्शनाची व्यवस्था अत्यंत सुरळीत पार पडली. रात्री बारा वाजता समता सैनिकदलाने पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून पंचशील ग्रहण केले. बौद्ध धर्मीय संस्थांनी आणि विविध संघटनांनी पुतळ्याला भावपूर्ण अभिवादन करत वातावरण समतेच्या, धम्माच्या आणि बंधुभावाच्या प्रकाशाने उजळून निघाले.
मध्यरात्री बारा वाजता रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे जिल्हा रुग्णालयाशेजारी आले. ते तेथे दाखल होताच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी स्वतःहून रस्ता मोकळा करून देत त्यांचे स्वागत केले. बगाटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत सलामी देत अभिवादन केले. या वेळी अप्पर पोलिस अधीक्षक महामुनी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी माईनकर, शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनीही उपस्थित राहून अभिवादन केले.
गावोगावी, वाडीवस्तीतून आलेल्या लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील अनुयायांनी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास डॉ. आंबेडकरांचा जयजयकार केला. वाहतूक आणि शिस्त नियंत्रणासाठी शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी बंदोबस्ताची काटेकोर आखणी केली. अनुयायांची गर्दी असूनही कार्यक्रम शांततेत पार पडला. पोलिसांकडून मिळालेल्या या सहकार्यामुळे आणि समता सैनिकदलाच्या सैनिकांच्या सुयोग्य समन्वयामुळे धम्म बांधवांना दर्शन सुकर झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

