नवजीवन हायस्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उदघाटन
-rat६p२२.jpg-
P25O08904
राजापूर ः वार्षिक क्रीडा स्पर्धा व फनफेअर कार्यक्रमाचे उद्घाटन करताना पोलिस निरीक्षक अमित यादव व गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले.
----
‘नवजीवन’मध्ये क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ६ : शारिरीक व मानसिक तंदुरुस्ती ही निरोगी आयुष्य जगण्याचे रहस्य आहे. ही तंदुरुस्ती खेळामुळे विकसित होऊ शकते. उत्तम मैदानी कौशल्य असणारे सर्व विद्यार्थी भारताच्या सर्व संरक्षण विभागांचा करिअरसाठी विचार करू शकतात, असे प्रतिपादन राजापूर पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी नवजीवन हायस्कूल येथे केले.
प्रशालेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा व फनफेअर कार्यक्रमाचे उद्घाटन पोलिस निरीक्षक अमित यादव व गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांच्या हस्ते झाले. या वेळी प्राचार्य राजेंद्रकुमार व्हनमाने, राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुलतान ठाकूर, गुजराळी केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल जायदे, विषयतज्ज्ञ तन्वीर खान, राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सदस्य मुश्ताक वाडकर आदी उपस्थित होते.
या क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी, खो-खो, क्रिकेट, गोळाफेक, थाळीफेक, १००, २००, ४०० मी. धावणे, भालाफेक, डॉजबॉल या मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले. फनफेअरमध्ये विविध फनीगेमचे स्टॉल व फूड स्टॉल लावले गेले ज्यामुळे विद्यार्थ्यांचे मनोरंजन तर होईलच; पण त्याचबरोबर व्यवस्थापन, व्यवहार्यता यांसारखे गुण विद्यार्थ्यांच्या अंगी विकसित होतील.
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत खेळाचा महत्त्वाचा वाटा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

