घरफोड्या निघाला स्थानिक

घरफोड्या निघाला स्थानिक

Published on

घरफोड्या निघाला स्थानिक

संशयित अटकेत; रोणापाल प्रकरणाचा छडा

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ६ ः रोणापाल येथे भर दिवसा झालेल्या घरफोडीतील संशयिताला पकडण्यात पोलिसांना यश आले असून त्याला अटक करण्यात आली आहे. अजय अर्जुन गावडे (वय २७, रा. रोणापाल, भरडवाडी, ता. सावंतवाडी) असे त्याचे नाव आहे. या गुन्ह्यातील तो प्रमुख संशियत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी दिली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी विविध तांत्रिक पुरावे, घटनास्थळावरील पडताळणी, संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेत प्रभावी तपास सुरू ठेवला. त्यादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा ठावठिकाणा मिळवत शुक्रवारी (ता. ५) त्याला अटक करण्यात आली. पुढील चौकशीत संशयिताकडून ३० हजार रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे ६.५ ग्रॅमचे सोन्याचे दागिने असा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. ही घरफोडीची घटना आठ दिवसांपूर्वी घडली होती. प्राथमिक तपासात पोलिसांना अजय गावडे याच्यावर संशय होता. पोलिसांनी कसून तपास केला असता चोरीत त्याचा सहभाग असल्याचे उघड झाले. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय गवस, तात्या कोळेकर, पोलिस हवालदार राजेश गवस, सिद्धार्थ माळकर, राजू कापसे, श्री. पालकर, महिला हवालदार संगीता वरक यांच्या टिमने केली.
---
पोलिसांनी गस्त वाढवावा
अलीकडे परिसरात घरफोड्या आणि चोरीच्या घटना वाढत आहेत. दिवसाढवळ्या घडणाऱ्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गस्त वाढवून तांत्रिक तपास अधिक मजबूत करण्याची गरज आहे. नागरिकांनीही सावधगिरी बाळगून संशयास्पद हालचालींची तत्काळ माहिती पोलिसांना देणे आवश्यक असल्याचे मत काही नागरिकांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com