विज्ञान प्रदर्शनात ११० विज्ञान प्रतिकृती

विज्ञान प्रदर्शनात ११० विज्ञान प्रतिकृती

Published on

-rat७p६.jpg-
२५O०९०७०
रत्नागिरी ः विज्ञान प्रदर्शनात मांडलेल्या विज्ञान प्रतिकृतीची माहिती देताना विद्यार्थिनी.
-rat७p२२.jpg-
P२५O०९१३७
रत्नागिरी ः भूकंपाचा अलार्म प्रतिकृती दाखवताना पाली नं.१ चे विद्यार्थी यश डोंगरे, गौरव पांचाळ, मार्गदर्शक शिक्षक श्रुती वारंग आदी.
---
विज्ञानाच्या विश्वात विद्यार्थ्यांनी घेतली झेप
रत्नागिरीत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ; ११० प्रतिकृतींची मांडणी, प्रश्नमंजूषेतही चमक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ ः विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पनांना व्यासपीठ मिळवून देणारे रत्नागिरी तालुकास्तरीय ५३ वे विज्ञान प्रदर्शन नुकतेच सर्वंकष विद्यामंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रदर्शनात रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी ११० विज्ञान प्रतिकृती मांडल्या होत्या तर प्रश्नमंजूषा प्रकारात २९ जणांचा सहभाग होता.
विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती वाढावी आणि दैनंदिन जीवनातील समस्यांवर विज्ञानाच्या आधारावर उपाय शोधता यावेत, या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ऊर्जा बचत, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन, कचरा व्यवस्थापन, आणि आधुनिक तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवर आधारित मॉडेल्स विद्यार्थ्यांनी मांडले. काही विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या यंत्रणा, पाण्याचे शुद्धीकरण करण्याचे स्वस्त तंत्रज्ञान, तर काहींनी भूकंपापासून बचाव करणाऱ्या इमारतींचे मॉडेल्स बनवली होते.
स्पर्धेचा निकाल असा ः *प्रयोगशाळा सहाय्यक परिचर ः आरती मयेकर (मानवी आंतर इंद्रियाची ओळख ः देसाई विद्यालय, हातखंबा), इत्मियाज काझी (टाकाऊतून टिकाऊ ः मिस्त्री हायस्कूल), रुही फोंडू (वेस्ट मॅनेजमेंट व अल्टरनेट टू प्लास्टिक ः नाखवा कनिष्ठ महाविद्यालय, पावस). * अध्यापक शैक्षणिक साहित्य निर्मिती प्राथमिक स्तर ः प्रशांत मांडवकर (दामले विद्यालय), इत्मियाज सिद्दिकी (मिस्त्री हायस्कूल), अनय बांबाडे (शिवार आंबेरे). * अध्यापक शैक्षणिक साहित्य निर्मिती माध्यमिक स्तर ः दत्तात्रय बनगर (फाटक हायस्कूल), प्रशांत ठाकूर (नाणीज विद्यामंदिर), हजेफा मुकादम (मिस्त्री हायस्कूल). * प्रश्नमंजूषा ः सफा बेग व मआज सुवर्णदुर्गकर (सेक्रेड हार्ट कॉन्हेंट हायस्कूल, उद्यमनगर), नित्या फणसे व नरहरी भावे (पटवर्धन हायस्कूल), वेदांत पाचकुडे व पार्थ पाचकुडे (करबुडे मा. विद्यालय). * विज्ञान प्रतिकृती निर्मिती दिव्यांग प्राथमिक स्तर ः ओम धनावडे वन्यप्राण्यांपासून शेती संरक्षण ः कारवांचीवाडी जि. प. शाळा), हाफिजा वस्ता (स्मार्ट अॅग्रीकल्चर ः झुलेखा दाऊद हायस्कुल). माध्यमिक स्तर ः स्वर सुवरे (गार्डिअन एक्स स्मार्ट सिस्टिम ः जोशी इंग्लिश मीडिअम स्कूल), रुद्र थूळ (स्मार्ट हॅंडबॉल ः नवनिर्माण स्कूल), चाहत गांधी (ओल्डेज होम ः सर्वंकष विद्यामंदिर). * विज्ञान प्रतिकृती निर्मिती माध्यमिक स्तर ः तन्वी माईन (वूमन सेफ्टी डिव्हाईस ः सामंत स्कूल), पियुष हंगीरगेकर (प्लॅटफॉर्म सेफ्टी फ्लॅप ः खेडशी विद्यालय), यश भिडे (बायोडिग्रेडेबल प्लास्टिक ः फाटक हायस्कूल).
--------
चौकट
भूकंपाचा अलार्मची प्रतिकृती लक्षवेधी
विज्ञान प्रदर्शनात जि.प.पू.प्रा.आदर्श विद्यामंदिर पाली नं.१ शाळेने ठेवलेली भूकंपाचा अलार्म ही आपत्ती व्यवस्थापन या विषयावर आधारित वैज्ञानिक प्रतिकृती विशेष लक्षवेधी ठरली. ही प्रतिकृती शाळेतील विद्यार्थी यश महेश डोंगरे, गौरव योगेश पांचाळ यांनी विज्ञान शिक्षक श्रुती जयसिंग वारंग यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com