स्वच्छ अभियानांतर्गत पाली बसस्थानकाचे तृतीय सर्वेक्षण

स्वच्छ अभियानांतर्गत पाली बसस्थानकाचे तृतीय सर्वेक्षण

Published on

rat7p24.jpg-
09139
पाली ः स्वच्छ अभियानांतर्गत पाली बसस्थानकाची पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या स्वागतप्रसंगी उपस्थित डावीकडून संदीप गराटे, ललित आयरे, यंत्र अभियंता यशवंत कानतोडे, विभागीय अधिकारी गीतांजली सूर्यवंशी, प्रदीप सावंत आदी.
---------
पाली बसस्थानकाचे तृतीय सर्वेक्षण
स्वच्छ अभियानांतर्गत; कोल्हापूरच्या पथकाकडून पाहणी, स्थानकात सीसीटीव्ही बसणार
सकाळ वृत्तसेवा
पाली, ता. ७ः हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाचे यंत्र अभियंता यशवंत कानतोडे, विभागीय अधिकारी गीतांजली सूर्यवंशी यांनी तिसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण करून मूल्यांकन केले. या पथकाने बसस्थानक परिसर, पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, व्यावसायिक आस्थापना यांची पाहणी करत प्रवाशांबरोबर संवाद साधला.
स्वच्छता अभियानांतर्गत सुरू असलेल्या या तपासणी सर्वेक्षणावेळी अ‍ॅड. सागर पाखरे, पोलिसपाटील अमेय वेल्हाळ यांनी अभिप्राय नोंदविले आहेत. याप्रसंगी माजी सरपंच संदीप गराटे, लांजा आगार वाहतूक नियंत्रक ललित आयरे, पाली बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक प्रदीप सावंत, एसटी कर्मचारी, प्रवासी मित्र उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या निधीतून पाली बसस्थानकाचे गतवर्षी नूतनीकरण करून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. याठिकाणी सुसज्ज अशी वास्तू उभी करण्यात आली आहे. त्यामुळेच पहिल्या सर्वेक्षणात ब वर्ग प्रकारात या बसस्थानकाला दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. पाली बसस्थानक हे व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे व मध्यवर्ती असल्याने कायमच प्रवाशांची रेलचेल असते. त्यामुळे या बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. बसस्थानक आवारात पे अँड पार्किंग व सेल्फी पॉईंटचीचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. या बसस्थानकाच्या आवारात बगीचाही प्रस्तावित केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोट
येथील एसटी परिवहन महामंडळाचे बसस्थानक हे कोकण विभागातील प्रमुख बसस्थानक आहे. मुंबई-गोवा आणि मिऱ्या-नागपूर या दोन मुख्य राष्ट्रीय महामार्गांवर असल्यामुळे याठिकाणी कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र, गोवा, तळकोकण यासोबतच मुंबई विभागातील प्रवाशांसाठी मध्यवर्ती बसस्थानक म्हणून ओळखले जाते. हे लक्षात घेऊन काही महिन्यांपूर्वी येथील नूतनीकरण करण्यात आले. एसटी महामंडळाच्या पहिल्या सर्वेक्षणात हे बसस्थानक दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- यशवंत कानतोडे, यंत्र अभियंता, कोल्हापूर विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com