रत्नागिरी- स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त बालदिंडी

रत्नागिरी- स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त बालदिंडी

Published on

rat7p27.jpg-
09142
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे आयोजित बालदिंडी सोहळ्यात बाल वारकऱ्यांसोबत डॉ. कल्पना मेहता या सहभागी झाल्या होत्या.
rat7p28.jpg-
09143
रत्नागिरी : बालदिंडीमधील विजेते विद्यार्थी.
-----------

स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त बालदिंडी
भक्तिमय वातावरण;
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : स्वामी स्वरूपानंद यांच्या जयंतीनिमित्त स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ (पावस) तसेच रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोदूताई जांभेकर विद्यालयातर्फे आयोजित बालदिंडीने वातावरण भक्तिमय झाले. आज सकाळी लक्ष्मीचौक ते अध्यात्म मंदिरपर्यंत हा सोहळा रंगला. या बालदिंडीने संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला.
लक्ष्मी चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत विधीवत पूजन केले. टाळ मृदंगांच्या गजरात, ढोल-ताशांच्या निनादात आणि वारकरी संप्रदायाच्या गजरात बालदिंडीने मार्गक्रमण सुरू केले. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करून या दिंडीचे दर्शन घेतले. अनेक नागरिकांनी बालवारकऱ्यांचे स्वागत केले. वारकऱ्यांच्या मुखातून निघणारे अभंग, जयघोष आणि टाळ-मृदंगाचा ताल यांनी संपूर्ण परिसर आनंदमयी व भक्तिरसात चिंब बनविला. बालवारकऱ्यांनी संतांची रूपे साकारत, तुळशीवृंदावन, विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, मुक्ताई, रखुमाई आदींची वेशभूषा केली.
वेशभूषा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ सदस्य डॉ. कल्पना मेहता यांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष जयंत देसाई, कार्यवाह ऋषिकेश पटवर्धन, विश्वस्त हेमंत गोडबोले, सदस्य विवेक भावे, श्रीमती काळे, जांभेकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संजना तारी उपस्थित होत्या. सहभागी शाळांना प्रत्येकी ५,००० रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. कार्याध्यक्ष जयंतर देसाई यांनी सांगितले की, स्वामी स्वरूपानंद महाराजांचा भक्तीमार्ग आजही समाजाला दिशा देतो. त्यांच्या जयंतीनिमित्त बालदिंडीसारखे उपक्रम राबविणे हे आमचे सौभाग्य आहे.

चौकट १
वेशभूषा स्पर्धेचा निकाल
बालदिंडीच्या निमित्ताने सामाजिक ऐक्य, धार्मिक सहिष्णुता, भक्ती, सेवा, संस्कार आणि भारतीय संस्कृतीचे जतन या मूल्यांची प्रकर्षाने जाणीव उपस्थितांना झाली. प्रथम- श्रीरंग तेंडुलकर (ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर), द्वितीय दूर्वा बंडबे (कृ. चिं. आगाशे विद्यामंदिर), तृतीय- सोहम साळवी (दामले विद्यालय), उत्तेजनार्थ पारितोषिके : स्वरदा घाटे (ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यालय), विहान चव्हाण (जी. जी. पी. एस.), विशेष पारितोषिक : ओम तेंडुलकर
------------
कोट
“लहान वयातच मुलांमध्ये अध्यात्मिक मूल्ये, भक्तीभाव, संस्कार आणि सांस्कृतिक परंपरेची ओळख निर्माण करणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांमुळे मुलांचे व्यक्तिमत्व घडत जाते. बालदिंडीसारखे उपक्रम समाजाला सकारात्मक ऊर्जा देतात.”
- डॉ. कल्पना मेहता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com