कणकवली : गोपुरी आश्रम कार्यशाळा

कणकवली : गोपुरी आश्रम कार्यशाळा

Published on

kan82.jpg
09229
कणकवली : येथील गोपुरी आश्रमातील कार्यशाळेत पर्यावरण तज्‍ज्ञ राजेंद्र केरकर यांनी मार्गदर्शन केले.


प्लास्टिकचा वापर रोखण्यात विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची
राजेंद्र केरकर : कणकवली गोपुरी कावी कला प्रशिक्षण कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ८ : प्लास्टिक हा घटक मानवासह निसर्ग आणि संपूर्ण पर्यावरणासाठी घातक आहे. दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर कमीत कमी व्हायला हवा. त्‍यासाठी जनजागृती होणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी प्लास्टिक मुक्‍तीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन गोवा येथील ज्‍येष्‍ठ पर्यावरण तज्‍ज्ञ राजेंद्र केरकर यांनी केले.
येथील गोपुरी आश्रमात जीवन शिक्षण शाळा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी कावी कला प्रशिक्षण कार्यशाळा झाली. यात राजेंद्र केरकर यांनी प्लास्टिकचे प्रदूषण आणि पर्यावरणावर होणारा परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. तर कावी चित्रे रेखाटनाबाबत समृद्धी केरकर यांनी विद्यार्थ्यांना धडे दिले.
राजेंद्र केरकर म्‍हणाले, आज कुठेही प्लास्टिक कचरा फेकून दिला जातोय. त्‍यावर सर्वात आधी नियंत्रण यायला हवे. त्‍यासाठी आता विद्यार्थ्यांनीच आपल्‍या आईवडीलांचे, नातेवाईकांचे प्रबोधन करायला हवे. याखेरीज रोजच्या खाण्या-पिण्याच्या वस्तूंमध्येही प्लास्टिकचे विघटन होतेय. त्‍यावर उपाययोजना आणि जनजागृती होणे गरजेचे आहे.
या कार्यशाळेत पौर्णिमा केरकर, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री, चित्रकार नामनंद मोडकर, वामन पंडित, प्रा. बाळकृष्ण गावडे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी आश्रमाचे संदीप सावंत, विनायक सापळे, धीरज मेस्त्री, अर्पिता मुंबरकर, दर्शना पाताडे, सदाशिव राणे, नितीन तळेकर, समृद्धी केरकर, सुरेखा वरडेकर, सनीश अवखळे, वेदांत केरकर, श्रेयश शिंदे, सहदेव पाटकर आदी उपस्थित होते.
गोपुरी आश्रमाच्या कावी कला कार्यशाळेमुळे भविष्यात निसर्ग व पर्यावरण संरक्षण करणारे कलाकार घडतील, असा विश्वास पौर्णिमा केरकर यांनी व्यक्त केला. विनायक सापळे यांनी आभार मानले.
गोपुरी आश्रमातील कावी चित्रे प्रशिक्षण कार्यशाळेत १०० हून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात विद्यार्थ्यांनी मातीच्या रंगापासून कावी चित्र रेखाटली. ही चित्रे कशी रेखाटावीत, याबाबत समृद्धी केरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कावी चित्रकलेचा इतिहास समृद्धी केरकर यांनी विद्यार्थ्यांना समजून सांगितला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com