पर्वत – शेतकऱ्यांचा आधारस्तंभ
जागतिक पर्वत दिन---------लोगो
पर्वत – शेतकऱ्यांचा आधारस्तंभ
(२५ नोव्हेंबर टुडे ३)
पर्वत ही शेतीसाठी एक महत्त्वपूर्ण भौगोलिक उपलब्धी आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पर्वत हवामान ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. पर्वत मॉन्सूनसारखे वारे अडवून एका बाजूला पाऊस पाडतात आणि दुसऱ्या बाजूला कोरडे पर्जन्यछायेचे प्रदेश तयार करतात. पर्वतांच्या उंचीमुळे हवेचे तापमान कमी होते. सर्व नद्या पर्वतांमध्ये उगम पावतात ज्या सिंचनासाठी उपयुक्त ठरतात.
- rat८p२.jpg -
25O09231
- कुणाल अणेराव
वरिष्ठ प्रकल्प अधिकारी
सृष्टीज्ञान संस्था
------
हिमालयासारख्या पर्वतांमध्ये उगम पावलेल्या सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रासारख्या नद्या सिंचनासाठी बारमाही पाणीपुरवठा करतात. वादळवारे आणि पाऊस यामुळे पर्वतांची झीज होऊन माती तयार होत असते. हीच माती नद्या मोठ्या प्रमाणावर मैदानी प्रदेशात वाहून आणतात आणि शेतीसाठी गाळाची सुपीक जमीन तयार होते.
पर्वतरांगांमधील वेगवेगळ्या उंचीमुळे विविध प्रकारचे सूक्ष्म हवामान तयार होते जे चहा, कॉफी, सफरचंद, नाशपती, स्ट्रॉबेरीसारख्या विशिष्ट पिकांसाठी उपयुक्त ठरते. त्याचप्रमाणे पर्वतांवरील जंगलांमध्ये करवंदे, अळू, आवळा, तोरणसारखा विविध प्रकारचा रानमेवा उपलब्ध असतो. धनगर शेळ्या-मेंढ्या घेऊन याच पर्वतांवर चरायला घेऊन जातात. त्यापासून आपल्याला लोकर, दूध, मटण अशी उत्पादने मिळतात. पर्वतांमध्ये विविध प्रकारच्या परिसंस्था जसे की, सदाहरित, पानझडीचे जंगल, गावताळ आणि झुडपांचे प्रदेश इ. नांदत असतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर प्राणी आणि वनस्पती यांच्यात मोठी विविधता आढळून येते. यात दुर्मिळ औषधी वनस्पतींचा समावेश होतो शिवाय मध, लाखसारखे वनोपज या जंगलातून मिळतात.
जागतिक पर्वतदिनानिमित्त आपल्या अत्यंत जवळच्या आणि या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या सह्याद्रीबद्दल जाणून घेणे औचित्याचे ठरेल. रोमहर्षक इतिहास बाळगणारे किल्ले, लेणी, गिर्यारोहकांना आव्हान देणाऱ्या कडेकपारी, डोंगरमाथ्याचे आकर्षक दृश्य, आल्हाददायक हवामान आणि मनाला उल्हासित करणारी सह्याद्रीतील जैवविविधता यामुळे सह्याद्रीच्या सान्निध्यात राहणे ही एक पर्वणीच!
पृथ्वीवरील डायनासोर युगाचा अंत झाला. भारतात ज्ञात असलेल्या १५०० गुहा आणि कोरीव लेणी यापैकी ७५ टक्के महाराष्ट्रात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज १६८० मध्ये निधन पावल्यानंतर १७०७ मध्ये औरंगजेबाचे निधन झाले, तोपर्यंत २७ वर्षात तो महाराष्ट्र जिंकू शकला नाही. इतिहासातील ही तीन वेगवेगळ्या काळातील वेगवेगळी विधाने असली तरी त्यांचे उत्तर एकच आहे. सह्याद्री होता म्हणून पृथ्वीचे कवच तयार होत होते. तेव्हा भूपृष्ठांचे थर सरकत सरकत सुमारे दहा हजार किलोमीटरच्या वर सरकले आणि त्यानंतर सुरू झाला प्रसिद्ध डेक्कन ज्वालामुखी उद्रेक! पासष्ट दशलक्ष वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या उद्रेकात सह्याद्रीची निर्मिती झाली. त्या काळातील ज्वालामुखींच्या तीव्रतेमुळे अचानकपणे वातावरणातील तापमान वाढले. त्यामुळे, त्या काळी पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या वनस्पती आणि प्राणीप्रजाती नष्ट झाल्या. ज्यामध्ये डायनासोर आणि अमोनाइट्सची संपूर्ण श्रेणी नामशेष झाली. पृथ्वीवरील डायनासोर युगाचा अंत झाला.
कोरीवकाम आणि खोदकाम करण्यासाठी आवश्यक असलेला कठीणपणा आणि ते सौंदर्य पेलण्यासाठी हवी असलेली नजाकत ही सह्याद्रीच्या बेसॉल्ट खडकात असल्याने बौद्ध, जैन आणि हिंदू धर्मियांची मंदिरे, चैत्यगृह, विश्रामगृह त्याचप्रमाणे किल्ले यासारखी बांधकामे मोठ्या प्रमाणावर केलेली आढळून येतात. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील कारलेभाजे लेणी असोत की, आपल्या कलाकुसरीमुळे जागतिक वारसायादीत स्थान मिळवणाऱ्या अजंठा-एलोरा येथील लेणी असोत की, मराठीचा पहिला देवनागरी शिलालेख मिरवणारी श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथील गोमटेश्वराची अखंड पाषाणात कोरलेली ५८ फुटी मूर्ती असो, हे सारे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर कोरलेले आहेत. भारतात ज्ञात असलेल्या १५०० गुहा आणि कोरीव लेणी यांच्यापैकी ७५ टक्के महाराष्ट्रात आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांची ‘गनिमी कावा’ ही युद्धनीती ही पूर्णपणे सह्याद्रीच्या रचनेला धरून होती. आपल्या मुलखाचे डोंगरदऱ्या, दाट जंगले यांचा वापर करून महाराजांनी महाराष्ट्राचे स्वराज्य उभे केले. १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या झालेल्या मृत्यूनंतर औरंगजेब महाराष्ट्र जिंकायचाच, या ईर्ष्येने ठाण मांडून बसला होता. पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी अवघे नऊ वर्षे राज्य केले. १६८९ मध्ये संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा पुत्र राजाराम यांनी तमिळनाडूतील जिंजी येथूनच कारभार पाहिला. अखेरिस, औरंगजेबाचा वृद्धापकाळाने १७०७ मध्ये अहमदनगर येथे मृत्यू झाला; पण त्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. औरंगजेब २७ वर्षात महाराष्ट्र जिंकू शकला नाही कारण, संताजी-धनाजी-आमात्य बावडेकर यांच्यासारख्या सरदारांसोबत सह्यकडा घट्ट पाय रोवून महाराष्ट्राची पाठराखण करत राहिला.
(लेखक स्वत: शेतकरी असून, आदिम बियाणी संवर्धन करत आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

