वेर्ले येथे उद्या जत्रोत्सवाचे आयोजन
वेर्ले येथे उद्या
जत्रोत्सवाचे आयोजन
सावंतवाडी, ता. ८ ः वेर्ले येथील श्री देवी पावणाई देवस्थान मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव १० तारखेला होत आहे. सकाळी पूजा-अर्चा, रात्री पालखी मिरवणूक व आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
.........................
आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी
प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन
वेंगुर्ले, ता. ८ ः नगर वाचनालय, वेंगुर्ले संस्थेतर्फे २०१७ पासून अनिल श्रीकृष्ण सौदागर पुरस्कृत ’श्रीकृष्ण सखाराम सौदागर स्मृती’ आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात येत आहे. जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या एका पत्रकारास २०२४-२५ वर्षीचा आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख रुपये ५,००० रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. तरी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी व्यक्ती अथवा त्या पत्रकारांकरिता त्यांच्यावतीने त्यांचे निकटवर्ती पुरस्कारासाठी अर्ज करु शकतात. २४ डिसेंबरपर्यंत संस्थेच्या कार्यालयात अर्ज पाठवावेत अगर प्रत्यक्ष आणून द्यावेत. पुरस्काराबाबत अधिक माहितीसाठी अनिल सौदागर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
......................
रेडी येथे आज
विविध धार्मिक कार्यक्रम
रेडी, ता. ८ ः रेडी म्हारतळेवाडी येथील देव ब्राह्मण बांदवा मंदिराचा जीर्णोद्धार व ब्राह्मण मंदिराचा शिखर कलश स्थापना चतुर्थ वर्षपूर्ती सोहळा उद्या (ता.९) धार्मिक विधी व विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. मंदिरात सकाळी ११ वा., अभिषेक, दुपारी १२ वा. आरती व देवाचा कौल, दुपारी १ ते ३ पर्यंत महानैवेद्य, रात्री ८ ते १० वा. भजन (ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ, रेडी गावतळे), १० नंतर वाडेकर भजन व देवाचा कौल होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
.......................
सेवा निवृत्त कर्मचार्यांची
आज सावंतवाडी सभा
सावंतवाडी, ता. ८ ः सावंतवाडी- दोडामार्ग तालुके सेवा निवृत्ती कर्मचारी संघटनेची मासिक सभा उद्या (ता. ९) सकाळी १०.३० वाजता संघटनेच्या अपार्टमेंट, सालईवाडा, सावंतवाडी सद्गगुरू येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर सभेस सर्व सदस्य, संचालक मंडळ, कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थितीत राहवे, असे आवाहन सचिव संभाजी कांबळे व अध्यक्ष श्री. पणदुरकर यांनी केले आहे.
................
फुकेरी येथे आज
जत्रोत्सवाचे आयोजन
कोलझर, ता. ८ ः दुर्गमस्थानी असलेल्या फुकेरी गावचे ग्रामदैवत श्री वैजा माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या (ता. ९) होत आहे. नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणींची पाठीराखी अशी वैजा माऊलीची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते. यानिमित्त आज मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर कुळघराकडून सवाद्य देवतांचे आगमन झाले. त्यानंतर देवीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजविण्यात आले. यावेळी देवस्थानच्या मानकर्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरल्यानंतर देवीच्या दर्शनास प्रारंभ होणार आहे. रात्री १० वाजता लोटांगण व सवाद्य पालखी मिरवणूक आणि पावणीचा कार्यक्रम तर उशिरा सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. बुधवारी सकाळी लघुरुद्र, अभिषेक तर दुपारी महाप्रसाद होणार आहे. या जत्रोत्सवासाठी बांदा बसस्थानकातून भाविकांच्या सोईसाठी जादा बस सोडण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

