कोमसापमुळे साहित्य क्षेत्राला बळ

कोमसापमुळे साहित्य क्षेत्राला बळ

Published on

swt81.jpg
09255
कुडाळ: येथे कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित मेळावा व संमेलनाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना रणजित देसाई, सोबत मंगेश मसके, रूजारिओ पिंटो, अनंत वैद्य, प्रा. संतोष वालावलकर आणि इतर. (छायाचित्र - अजय सावंत)

कोमसापमुळे साहित्य क्षेत्राला बळ
रणजीत देसाई : कुडाळमधील मेळाव्याला प्रतिसाद
कुडाळ, ता. ८:सिंधुदुर्ग जिल्ह्याची साहित्यिक सांस्कृतिक राजधानी कुडाळ आहे. कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग ही शाखा उत्तम प्रकारे जिल्ह्यात साहित्यिक चळवळ पुढे नेत आहे. त्याही पुढे जाऊन जिल्ह्यातील सर्व लेखक साहित्यिकांचे संमेलन लवकरच घ्यावे या संमेलनाची सर्व जबाबदारी निश्चितपणे स्वीकारली जाईल. साहित्यिक कार्यकर्ता व कवी निर्माण करण्याचे काम अशा कार्यक्रमातून होत आहे हे कौतुकास्पद आहे, असे मत जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी व्यक्त केले.
येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या सभागृहात कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग व शाखा कुडाळ आयोजित जिल्हास्तरीय साहित्यिक कार्यकर्ता मेळावा व भाकरी आणि फूल कवी संमेलन आयोजित केले होते. याचे उद्घाटन श्री. देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. यावेळी व्यासपीठावर रूजारिओ पिंटो, मंगेश मसके, अनंत वैद्य, ॲड. संतोष सावंत, प्रा. संतोष वालावलकर, सुरेश ठाकूर, दीपक पटेकर, अभिमन्यू लोंढे, संदीप वालावलकर आदी उपस्थित होते.
ना. बा. रणसिंग, वैशाली पंडित, वृंदा कांबळी, संदीप वालावलकर, अनंत वैद्य यांचा कुडाळ शाखेच्या वतीने कोमसाप पुरस्कार मिळाल्याबद्दल व केंद्रीय समितीवर निवड झाल्याबद्दल शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
श्री. देसाई पुढे म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहित्य चळवळ आज वेगाने पुढे जात आहे. साहित्यिक, सांस्कृतिक, नाट्य क्षेत्रात आज कुडाळ सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जात आहे. कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून लवकरच लेखकांचा साहित्यिक मेळावा संमेलन घेण्याचा विचार आहे. या संमेलनाला मान्यवरांना निमंत्रित केले जाईल. सांस्कृतिक मंत्री व पालक मंत्री यांचे मार्गदर्शन व सहकार्य घेवून संमेलन यशस्वी करूया. साहित्यिक कार्यकर्ता मेळावा, कवी संमेलन असे एकत्रित आयोजित करून एक चांगला उपक्रम राबवण्यात आला आहे. त्याबद्दल खऱ्या अर्थाने कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग आणि कुडाळ शाखा यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.’’
कोमसाप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मसके म्हणाले, ‘‘कोकण मराठी साहित्य परिषद संपूर्ण कोकण विभागात साहित्य चळवळ उत्तम प्रकारे पुढे येत आहे. जिल्ह्यातील सर्व शाखा चांगले काम करत आहेत. साहित्यिक कार्यकर्ता मेळावा व कवी संमेलनाच्या माध्यमातून नवोदित साहित्य घडवण्याचे काम आम्ही करत आहोत, साहित्य संमेलन घेण्याचा विचार आहे.’’
कवी अनंत वैद्य यांनी तरूण पिढी आणि शालेय विद्यार्थी हे खऱ्या अर्थाने केंद्रबिंदू ठेवून आज आपण एक वेगळ्या पद्धतीने काम करण्याची गरज आहे आणि हे काम कोकण मराठी साहित्य परिषदेने करावे आणि एक नवी पिढी घडवावी असे सांगितले. यावेळी जिल्हा सहसचिव सुरेश पवार व स्नेहल फणसळकर यांनी सूत्रसंचालन केले. संदीप साळसकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष डॉ. दिपाली काजरेकर, स्नेहल
फणसळकर, कोषाध्यक्ष गोविंद पवार, स्वाती सावंत, वृंदा कांबळी, सुरेश पवार आदींनी सहकार्य केले. साईप्रसाद वेंगुर्लेकर, भरत गावडे, विठ्ठल कदम, कमलेश ठाकूर आदींनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com