म्हापण येथे १ फेब्रुवारीला राधारंग तर्फे हाफ मॅरेथॉन
म्हापण येथे १ फेब्रुवारीला
राधारंग तर्फे हाफ मॅरेथॉन
म्हापण, ता. ८: जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या राधारंग फाउंडेशनने १ फेब्रुवारी २०२६ ला हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. यंदाचे हे स्पर्धेचे पाचवे वर्ष असून यावर्षी ५, १० आणि २१ किमीची हाफ मॅरेथॉन होणार आहे.
या मॅरेथॉनमध्ये कोणत्याही वयोगटाचे स्त्री पुरुष सहभागी होऊ शकतात. यात नावनोंदणी करुन सहभागी होणाऱ्यांना टी शर्ट देण्यात येणार असून निवडलेले अंतर पूर्ण करणाऱ्यांना मेडल्स देण्यात येणार आहेत. सर्व सहभागींना मॅरेथॉन दरम्यान पाणी, फळे, अल्पोपहार, वैद्कीय मदत देण्यात येणार असून प्रशिक्षित स्टाफसह दोन अँब्युलन्स उपलब्ध असणार आहेत. ज्यांना गरज असेल त्यांच्यासाठी फिजीओथेरपीची सेवा उपलब्ध असणार आहे. ही मॅरेथॉन परुळे हायस्कुल येथून सुरु होणार आहे. सहभागासाठी ऑनलाईन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. यात सहभागी होणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी गोपाळ राऊळ यांच्याशी संपर्क साधावा.

