सैनिकांच्या कुटुंबासाठी सदैव तत्पर

सैनिकांच्या कुटुंबासाठी सदैव तत्पर

Published on

swt८७.jpg
०९३०८
सिंधुदुर्गनगरी : बंद पेटीत स्वतः पैसे टाकत सशस्त्र ध्वज निधी संकलनाचा प्रारंभ जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते झाला. यावेळी रवींद्र खेबुडकर, मोहन दहिकर, आरती देसाई.


सैनिकांच्या कुटुंबासाठी सदैव तत्पर
जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही: सशस्त्र ध्वजदिन निधी संकलनास प्रारंभ
ओरोस, ता .८: राष्ट्राच्या सुरक्षेसाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या सैनिकांचे योगदान अमूल्य आहे. वीर जवानांचे कुटुंब हे आपले कुटुंब आहे. त्यांची काळजी घेणे ही केवळ जबाबदारी नसून आपले नैतिक कर्तव्य आहे. या धारिष्ट्यपूर्ण सेवेसाठी कृतज्ञता म्हणून सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज सशस्त्र ध्वजदिन संकलन -२०२५ निधी प्रारंभ आणि ध्वजदिन प्रशस्तीपत्र वितरण सोहळा कार्यक्रमात केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपजिल्हाधिकारी आरती देसाई, सहायक जिल्हा सैनिक अधिकारी उमेश आईर आदी उपस्थित होते. यावेळी शहिद जवानांच्या प्रतिमेस पुष्पचक्र अर्पण करुन शहिद जवानांना श्रदांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमात ध्वजदिन -२०२५ चा निधी संकलन शुभारंभ देखील जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांच्या हस्ते झाला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वीरनारी, वीरमाता-पिता यांचा साडी, शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच शालेय क्षेत्रात व क्रिडा क्षेत्रात बहुमुल्य कामगीरी करणाऱ्या माजी सैनिक, विधवा पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार प्रशस्तीपत्रक व धनादेश सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र, पुणे यांच्या मार्फत प्रधान करण्यात आला. गुणवंत पाल्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी धोडमिसे पुढे म्हणाल्या, चीजिल्ह्यातील माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय तसेच सेवारत सैनिकांच्या परिवारांच्या कल्याणासाठी प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सैनिकांप्रती समाजाचे काही ऋण आहे. देशाच्या सीमांचे आणि स्वातंत्र्याचे प्राणपणाने रक्षण करताना तसेच देशात उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्था विषयक समस्या, अतिवृष्टी, वादळे किंवा भूकंपसारख्या आपत्तीत दुर्देवी नागरिकांच्या सहाय्याला त्वरेने धावून जावून बहुमोल कामगिरी बजाविणाऱ्या आपल्या सैनिकांचे ऋण अल्पस्वरूपात फेडण्याची संधी जनतेला ध्वजदिनाच्या निमित्ताने प्राप्त झाली. तिचा पुरेपूर लाभ घ्यावा."
जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. दहिकर यांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती संपूर्ण समाज मनोपूर्वक कृतज्ञ आहे. देशाच्या सुरक्षेसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या या वीर जवानांचे योगदान अविस्मरणीय असल्याचे सांगितले. उपजिल्हाधिकारी आरती देसाई यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी तर आभार सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर यांनी मानले.
दरम्यान सशस्त्र सेना ध्वजदिन – २०२४ च्या निधी संकलनासाठी आपल्या जिल्हाला ४१ लाख २५ हजार चे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ४१ लाख २५ हजार एवढा निधी संकलित करून दिलेल्या उद्दिष्टाच्या १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. २०२४ च्या निधी संकलनामध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांचेकडून प्रशस्ती पत्रक व भेटवस्तु वितरीत करण्यात आले. .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com