कोलगाव क्रीडास्पर्धेत आंबेगाव शाळा अव्वल

कोलगाव क्रीडास्पर्धेत आंबेगाव शाळा अव्वल

Published on

swt८८.jpg
०९३१७
कोलगाव : येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या आंबेगाव शाळेच्या मुलांसह शिक्षक.

कोलगाव क्रीडास्पर्धेत
आंबेगाव शाळा अव्वल
सावंतवाडी, ता. ८ : कोलगाव केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धेत आंबेगाव शाळा क्रमांक एकने जनरल चॅम्पियनशीप मिळवत घवघवीत यश प्राप्त केले. तब्बल ३२ चषकांसह आंबेगाव शाळा अव्वल ठरली.
या स्पर्धेत मोठा गट( मुलगे) कबड्डी व खो खो - विजेतपद ,मुली - खो खो - उपविजेते ,गौरव गावडे - २०० मी धावणे प्रथम तर उंच उडी - तृतीय, विकास विठ्ठल शेळके - उंच उडी - व्दितीय, लांब उडी - संग्राम मेस्त्री - प्रथम तर समित न्हानू कुंभार - तृतीय, गोळाफेक - सोहम सावंत - प्रथम आणि कार्तिक वरक - तृतीय, १००×४ रिले - मुलगे - उपविजेता
मोठा गट (मुली) - १०० मी धावणे - लक्ष्मी वरक - व्दितीय, उंच उडी - ईश्वरी सावंत - तृतीय क्रमांक, रूची शेळके २०० मी. धावणे तसेच लांब उडीमध्ये तृतीय, गोळा फेक - समृद्धी परब - व्दितीय तर कनिष्का सावंत - तृतीय ,
लहान गटात मुलांनी खो - खोचे विजेतेपद मिळवले तर मुली कबड्डी मध्ये विजेत्या ठरल्या. ५०×४ रिले - मुली - विजेते, मुलगे - उपविजेते, प्रज्ञा तेली ५० मी धावणे - तृतीय, रिद्धी शेळके १०० मी धावणे - व्दितीय तर उंच उडीमध्ये तृतीय, अनुष्का गवळी उंच उडी - प्रथम तर १०० मी धावणे तृतीय, स्वरा पालकर - लांब उडी - द्वितीय, गौरेश जाधव - लांब उडी आणि १०० मी धावणे - प्रथम, समूहगीतामध्ये लहान व मोठ्या गटाने विजेतेपद पटकावले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक प्रदीपकुमार म्हाडगुत, रसिका नाईक, क्रीडाशिक्षक नितीन सावंत, स्नेहल कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Marathi News Esakal
www.esakal.com