कालिदास व्याख्यनमालेस प्रारंभ
-rat८p७.jpg-
२५O०९२५२
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित कालिदास व्याख्यानमालेत डॉ. सुचेता परांजपे यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर. सोबत डॉ. कल्पना आठल्ये.
----
भरत वर्षाचा इतिहास म्हणजे महाभारत
डॉ. सुचेता परांजपे ः ६९व्या कालिदास व्याख्यनमालेस प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : महाभारतामध्ये कौरव-पांडवांचे युद्ध हा मुख्य विषय आहे. हा विषय ज्यामध्ये वर्णिला गेला त्या ग्रंथाचे वर्णन करताना जय नावाचा इतिहास व्यासांनी लिहिला गेला, असे मानले जाते. यामध्ये ८८०० श्लोकसंख्या होती. त्यानंतर २४ हजार श्लोकांचे भारत आणि १ लाख श्लोकांचे महाभारत अशा क्रमाने महाभारताची रचना झाली. महाभारत वाचताना ते आपल्या हजारो वर्षांचा भरत वर्षाचा इतिहास आहे तो इतिहास म्हणूनच समजून घ्यावा, असे प्रतिपादन पुण्यातील डॉ. सुचेता परांजपे यांनी केले.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ६९व्या कालिदास स्मृती समारोह व्याख्यानमालेत ‘महाभारत समज- गैरसमज’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये कार्यक्रम झाला. या प्रसंगी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी डॉ. परांजपे यांचा सन्मान केला तर संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने महाभारताची चिकित्सक आवृत्ती (क्रिटिकल एडिशन) प्रकाशित केली. पितामह भीष्म हे युद्धभूमीवर बाणांच्या शय्येवर (शरपंजरी) नव्हे तर शर नावाच्या अतिशय मऊ गवतावर झोपलेले असावेत. द्रौपदीची थाळी नव्हे तर युधिष्ठराला अक्षयपात्र सूर्यदेवाने दिले होते. अशा काही समज, गैरसमजांबद्दल डॉ. परांजपे यांनी खुलासा केला. व्याख्यानमालेचा समारोप मंगळवारी (ता. ९) सकाळी १०.३० वा. डॉ. परांजपे यांच्या व्याख्यानाने होणार आहे.
------------
चौकट १
युद्धातही वार्तिक होते
आजही कोणत्याही युद्धात वार्ताहरांना संरक्षण असते. त्याप्रमाणे कुरूक्षेत्रावर कौरव-पांडवांच्या युद्धात वार्तिक होते. ते संजयाला माहिती देत होते व तो अंध ध्रुतराष्ट्राला माहिती देत होता. संजयला दिव्यदृष्टी नव्हती; पण तो योद्धा होता. त्याने धनुष्य हाती घेतले नसले तरी युद्ध सुरू झाल्यावर चौथ्या दिवशी तो कुरूक्षेत्रावर गेला व त्याने एका रथाचे सारथ्य केले होते, असे श्लोकांवरून समजते. हा सूर्य हा जयद्रथ, नरो वा कुंजरो वा, पुराणातली वानगी पुराणात अशी विधाने, सूतोवाच करणे, बकाबक जेवणे असे मराठीत आपण वापरत असलेले अनेक शब्द हे महाभारत आपल्या रक्तात भिनले आहे याचे निदर्शक आहेत, असे डॉ. परांजपे म्हणाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

