आंबा, काजूचे १८,०९५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

आंबा, काजूचे १८,०९५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Published on

विमा कवचात ३६ हजार शेतकरी
१८ हजार ९५ हेक्टर क्षेत्र संरक्षित; हप्त्यापोटी भरले २१ कोटी ८४ लाख
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ ः आंबिया बहरातील आंबा, काजू फळपीक विमा योजनेचा जिल्ह्यातील ३६ हजार २८८ शेतकऱ्यांनी विमा उतरवला असून, १८ हजार ९५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. गतवर्षी एवढ्याच बागायतदारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. शेतकऱ्यांनी विमा हप्त्यापोटी २१ कोटी ८४ लाख ६६ हजार रुपये भरले आहेत, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
बदलत्या हवामानामुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट होते आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान स्वीकारावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यांपासून संरक्षण मिळावे आणि नुकसान झाल्यास भरपाई मिळण्यासाठी कृषी विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबवण्यात येते. त्यात रत्नागिरी जिल्ह्यात अधिसूचित केलेल्या ८३ महसूल मंडळातील आंबा व काजूपिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण दिले जात आहे. यंदा हंगामाला विलंब होणार असून, मागील आठवड्यातच ढगाळ वातावरणामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. १ जानेवारी ते १५ मे या कालावधीत किमान तापमान, कमाल तापमान, वेगवान वारा, अवकाळी पाऊस या हवामान बदलांमुळे होणाऱ्या नुकसानीपोटी बागायतदारांना भरपाई मिळणार आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत विमा उतरवण्याची मुदत होती. त्याला गतवर्षाएवढाच प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये २६ हजार २१२ कर्जदार आणि १० हजार ७६ बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी १८ हजार ९५ हेक्टर क्षेत्रावरील विमा उतरवलेला असून, सर्वाधिक प्रतिसाद आंबा बागायतदारांचा आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीपोटी १०० कोटीचा लाभांश सुमारे ३२ हजार बागायतदारांना मिळाला होता; परंतु परतावा जाहीर करण्यास विलंब झाल्यामुळे बागायतदारांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. पुढीलवेळी परताव्याची रक्कम लवकर मिळावी, अशी मागणी केली जात आहे.
------
चौकट
- तालुकानिहाय विमा संरक्षित लाभार्थी व क्षेत्र
तालुका* लाभार्थी* विमा क्षेत्र (हेक्टर)
मंडणगड* ४,७७८* २,१०३.०४
दापोली* २,५५३* १,२०४.९५
खेड* ४,६०५* २,००४.७५
गुहागर* १,८९२* ९८२.०४
चिपळूण* ३,८६५* २,०३८.२७
संगमेश्वर* ६,६३८* ३,०३१.१५
रत्नागिरी* ४,१३६* १,७३७.७०
लांजा* ३,२०३* २,११३.४८
राजापूर* ४,६१८* २,८७९.६४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com